पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626 )

लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:-दिनांक २६/०१/२०२३ रोजी लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर हद्दीत मौजे वढु बुद्रुक गावचे हद्दीत तुळापुर ते लोणीकंद रोडवर हॉटेल सिताईचे समोर, ता. हवेली, जि. पुणे येथे कंटेनर मध्ये एक इसम जखमी व रक्ताचे थारोळ्यात बेशुध्द अवस्थेत मिळुन आलेबाबत पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली.

त्याअनुषंगाने सदर इसमास ससून हॉस्पीटल, पुणे येथे पुढील उपचारकामी घेवुन गेले असता नमुद इमसाचे डोक्यात कोणत्यातरी अवजड हत्याराने मारहाण करुन त्याचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाल्याने दिनांक २७/०१/२०२३ रोजी कंटेनर मालकाने अज्ञात आरोपी विरुद्ध दिलेल्या तक्रारी वरून लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८७/२०२३ भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

नमुद गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजानन पवार यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेणेकामी दोन पथके रवाना केली. तपासा दरम्यान एक पथक इंदापुर, पाटस, दौंड या भागातील टोलनाक्यांवरील सीसीटिव्ही फुटेज पाहणी करता रवाना झाली. तसेच तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव व त्यांचे पथकाने दाखल गुन्हयातील फियादी कंटेनर मालक संजय रामफल कालीरामना, रा. गुजरात याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणुन काम करीत असलेला शमशुल अली अहमद खान, रा. उत्तरप्रदेश हा मयत इसम नामे शहजाद अब्दुल कयुम अहमद याचे सोबत तामिळनाडु येथून चाकण, पुणे येथे कंटेनर मधील माल पोहचविण्यासाठी आला असलेबाबत सांगुन परंतु घटना घडलेनंतर शमशुल खान हा टेभुर्णी मार्गे नाशिककडे गेल्याचे समजले. यावरुन संशयित इसम शमशुल खान याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेणेकामी सपोनि गजानन जाधव यांचे पथक रवाना होवुन त्याचा तांत्रिक विश्लेषणद्वारे शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने सांगितल्या हकीकत व तांत्रिक विश्लेषणाचे केलेल्या तपासात विसंगती आढळुन आल्याने त्यास विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्याने वरील गुन्हा हा मयत इसम शहजाद याचे सोबत रस्ता चुकल्याचे રાવજન વારના વાવાતુન ત્યાના ખુન ત્યાવી વધુની વિત્યાને ત્યાપ વાન મુયાત વિનો २७/०१/२०१३ रोजी अटक करण्यात आलेली आहे. नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास सपोनि गजानन जाधव हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्री. किशोर जाधव, वरिष्त पोलीस निरीक्षक श्री. गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि निखिल पवार, सुहास पाटील गजानन जाधव, पोलीस अंमलदार कैलास उगले, सारंग दळे, अमित देशमुख, बाळासाहेब सकाटे, कैलास साळुंके सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे, समीर पिलाणे, पांडुरंग माने यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

3 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

14 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

14 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

14 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

14 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

15 hours ago