✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात 14 केंद्रांवर आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकुण 4 हजार 894 मतदारांपैकी 4 हजार 249 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील मतदानाची ही टक्केवारी 86.82 टक्के इतकी आहे.
संपूर्ण वर्धा जिल्हात सकाळी 8 वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. दुपारी 4 पर्यंत मतदारांना आपले मत नोंदवायचे होते. मतदान झालेल्या केंद्रांमध्ये तहसिल कार्यालय आष्टी या केंद्रावर 251 मतदारांनी मतदान केले. तहसिल कार्यालय इमारत कारंजा या केंद्रावर 217, नगर परिषद सभागृह आर्वी 287, ग्रामपंचायत इमारत रोहणा 102, पंचायत समिती कार्यालय सभागृह सेलू 121, नगर परिषद कार्यालय सभागृह सिंदी रेल्वे 48, नगर परिषद इमारत पुलगाव 237, भारत ज्ञान मंदिरम् वर्धा 618, लोक महाविद्यालय वर्धा येथील दोन केंद्रावर 1309, तहसिल कार्यालय समुद्रपूर 106, तहसिल कार्यालय देवळी 111, जीबीएमएम विद्यालय हिंगणघाट 811 तर ग्रामंपचायत कार्यालय वडनेर येथील केंद्रावर 31 मतदारांनी या प्रमाणे जिल्ह्यात सर्व केंद्रावर एकुण 4 हजार 249 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.
संपूर्ण वर्धा जिल्ह्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी 86.82 इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण 4 हजार 894 इतके मतदार होते. त्यापैकी 4 हजार 249 मतदारांनी मतदान केले. मतदानाची सर्वाधिक टक्केवारी सेलू येथील केंद्राची 96.80 टक्के इतकी आहे. त्यानंतर रोहणा 95.33 टक्के, पुलगाव 94.80 टक्के, कारंजा 94.76 टक्के, समुद्रपूर 94.64 टक्के, सिंदी 94.12 टक्के, देवळी 93.28 टक्के, आर्वी 93.18 टक्के, हिंगणघाट 91.85 टक्के, लोक महाविद्यालय परिसर केंद्र 91.32 टक्के, आष्टी 90.61 टक्के, वडनेर 79.49 टक्के, भारत ज्ञान मंदिरम वर्धा 78.33 टक्के तर लोक महाविद्यालय तळमजला 71.98 टक्के याप्रमाणे जिल्हाभरात 86.82 टक्के मतदान झाले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…