पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सिहंगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
पूणे :- सिंहगड रोड पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये पुणे शहर परिसरात दाखल असणा-या चैन स्नेचिंग च्या गुन्हयांचा पात सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम व त्यांची टिम यांनी दाखल गुन्हयांचे अनुषंगाने सी. सी.टि.व्ही कॅमेराचे आधारे व गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी काढण्याचे काम सुरू असताना सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ०८/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ मधील महिला फिर्यादी यांचे गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून तोडून नेणारे आरोपी हे सनसिटी शेठ भागात येणार असल्याबाबत गुप्त माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल ओलेकर शिवाजी क्षिरसागर, अमोल पाटील यांना त्याचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता सदर बातमी त्यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि सचिन निकम यांना सांगितली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा मुफजल आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन आबाजुस थांबुन बातमीप्रमाणे खात्री केली असता, खाडे वॉशिंग सेंटरच्या समोरिल बाजुस संशयितरित्या दोन इसम उमे असल्याचे दिसले असता त्यांना सापळा रचुन आहे त्या परिस्थीतीत पकडुन त्यांचेकडे सदर ठिकाणी येण्याचे कारण त्याचा नाव पत्ता विचारता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असता त्यांना सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे आणून सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नावे 1) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली निकाजी चव्हाण, वय २० वर्षे, रा. धनगर वस्ती, देवाची करी अंतरवाडी पुणे २) राजु महादेव डेगळे वय १९ वर्षे रा. प्रतिकनगर लेन नं १ कात्रज कोंढवा रोड, पुणे असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दिनांक ०३/०१/२०२३ रोजी सायंकाळी १९/५० वा. चे सुमा गिरीजा हॉटेल शेजारील बसस्टॉप जवळ धायरी, पुणे येथे एका महिल्याचे गळयातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून ओढुन तोडून नेल्याबाबत सांगितले असुन त्यांचा आणखीन एक साथीदार नामे गजानन दत्तात्रय बो-हाडे, वय ३० वर्षे, रा. हिवरकर मळा, सासवड पुणे यांचेसोबत पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी चैन स्नेचिंग गुन्हे केल्याचे कबुली दिली असता आरोपींना सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी सदर गुन्हयात दिनांक २३/०१/२०२३ रोजी अटक करून पोलीस कस्टडीमध्ये त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी पुणे शहरामध्ये खालील गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन झाले आहे.
१) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ०८/२०२३, भा.द.वि. कलम ३९२, ३४ २) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ३३० / २०२२, भा.द.वि. कलम ३९२, ३४
(३) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ३८/२०२३. भा.द.वि. कलम ३९२, ३४ (४) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ५६/२०२३. भा.द.वि. कलम ३९२, ३४
(१५) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ४४५/२०२२, भा.द.वि. कलम ३९२, ३४
६) भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ८१२ / २०२२ मा. द. वि. कलम ३९२.३४
1७) भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ८८० / २०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४ (८) समर्थ पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ (९) हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १६७८/२०२२ भा.द.वि. कलम ३९२ ३४
(१०) कोडवा पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १२२५/२०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४
वरिल प्रमाणे एकुण १० गुन्हे उघड झाले आहेत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, सिंहगडरोड पोलीस
स्टेशन पुणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त सो, मा. संदिप कर्णिक पोलीस सह आयुक्त सो. मा. श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, मा. श्री सुहेल शर्मा, पोलीस उप-आयुक्त सो परि ३. पुणे मा. श्री. राजेंद्र गलांडे, सहा पोलीस आयुक्त सो, सिंहगड रोड विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, श्री. जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, श्री. सचिन निकम, सहा पोलीस निरीक्षक, गणेश मोकाशी, पोलीस उप निरीक्षक, श्री. आबा उत्तेकर, सहा. पोलीस फौजदार, पो.हवा. संजय शिंदे, पो. हवा. धनंजय शेटे, पो. हवा. सुनिल साळुंखे, पोलीस जंगलदार राजु वेगरे, अमित बोडरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोडे, अमोल पाटील, स्वप्नील मगर, विकास पांडुळे, विकास बांदल, सागर शेडगे, यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…