नागपुर: पतीला पाठवला ‘गुड न्यूज’ चा मॅसेज, मग आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलीबरोबर उचलल खळबळजनक पाऊल.

✒️संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक खळबळजनक दुर्दैवी घटना समोर आली आहे. परीवरामध्ये सतत होत असलेल्या वादातून एका विवाहित महिलेने आपल्या पोटच्या तीन वर्षाच्या चिमुकलीसह अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना समोर येतात संपूर्ण नागपुर शहरात एकच खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी या विवाहित महिलेने आपल्या आपल्या पतीला ‘गुड न्यूज’ चा मॅसेज मोबाईल फोन वर केला, त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. कल्पना पंडागळे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

एका महिलेला आपल्या चिमुकल्या बाळासह अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली अशी माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली. यावेळी जेव्हा मायलेकींचे मृतदेह बाहेर काढले होते, तेव्हा चिमुकली आईच्या छातीला कवटाळलेला अवस्थेत होती. हे दृश्य पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आलं.

पती करत होता सतत छळ..
मृतक कल्पना पंडागळे हीचा 2018 मध्ये रवी पंडागळे याच्याशी रीतिरिवाजाने लग्न झाल होत. लग्नानंतर दोघा पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. यातून पतीकडून वारंवार छळही होत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून कल्पना ही आपल सासर सोडून वडिलांकडे माहेरात राहत होती.

गुड न्युजचा मॅसेज आणि तलावात उडी..
कल्पना ही सोमवारी सकाळीच घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती संध्याकाळच्या सुमारास अंबाझरी तलावाजवळ आली. तिने आपल्या मुलीला खाऊ पिऊ घातले. मग तिने आपल्या पतीला ‘उद्या गुड न्यूज मिळेल’ असा मॅसेज मोबाईल फोन वर केला. मग तिने मुलीसह तलावात उडी मारली.

महिलेने तलावात उडी मारल्याने लक्षात येताच तलावाजवळ उपस्थित असलेल्या दक्ष नागरिकांनी अंबाझरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अखेर मंगळवारी सकाळी दोन्ही मृतदेह शोधण्यास यश आले. तलावात उडी घेण्याआधी या महिलेने एका पिशवीत पती, वडिल आणि काही नातेवाईकांचे नंबर, तसेच काही कागदपत्रे ठेवली होती. याआधारे पोलिसांनी महिलेची ओळख पटवत तिच्या घरच्यांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी: अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा जनाधार झपाट्याने मजबूत होत आहे. नुकत्याच नारायणपूर येथे आयोजित…

25 mins ago

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो,न.9420751809. अहेरी: अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा जनाधार झपाट्याने मजबूत…

29 mins ago

*निवडणूक निशाणी - *'तुतारी वाजवणारा माणूस'* अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत रामपूर पॅच ग्रामपंचायतीतील रामपूर गावातील…

15 hours ago

व्यंकटरावपेठा येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद* – *भाग्यश्रीताई आत्राम यांना दिला पाठिंबा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…

15 hours ago

व्यंकटरावपेठा येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद* – *भाग्यश्रीताई आत्राम यांना दिला पाठिंबा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…

15 hours ago

व्यंकटरावपेठा येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद* – *भाग्यश्रीताई आत्राम यांना दिला पाठिंबा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…

15 hours ago