जागतीक आदिवासी दिनी नागपूर जिल्हात आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या.

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका, जिल्हा नागपूर.

हिंगणा:- नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इटेवाही गावामध्ये जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे.

सविस्तर वृत्त असे की महिन्याभरा पासून सततच्या मुसळधार पाऊसामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली व पिके उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकतेने खचून गेला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हिंगणा तालुक्यातील इटेवाही या गावात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. मृतक शेतकऱ्याचे नाव पांडुरंग मारोती उईके वय ५२ वर्ष असे असून त्याच्याकडे १६ एकर शेती आहे. शेतातील पीक बघून तो चिंताग्रस्त झाला आणि शेतातील तननाशक फवारणी करण्याच्या निमित्ताने तो घरून निघून गेला आणि शेतातच त्याने तणनाशक हे विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. या शेतकऱ्याकडे खाजगी व सोसायटीचे ३ लाख रुपयाचे कर्ज आहे. आता पिके उध्वस्त झाल्यामुळे आपण हे कर्ज कसे फेडणार यामुळे त्याने टोकाच पाऊल उचलले त्याच्यामागे ९० वर्ष वय असलेली म्हातारी आई, पत्नी २ मुले व १ विवाहित मुलगी असा परिवार आहे.

तालुक्यात प्रथमदा एवढी गंभीर घटना घडूनही आमदार , खासदार , व शासनाचा कोणताही प्रतिनिधी तिथे पोहोचला नव्हता स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही आदिवासी आहोत म्हणूनच हे लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात. आज वनामती येथे आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक व गुणगौरव सोहळ्याचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलताना म्हणाले की आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांच्याच नागपूर शहराला लागून असलेल्या हिंगणा तालुक्यात एक आदिवासी शेतकरी आत्महत्या करतो परंतु कोणताही लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी फिरकुनही पाहत नाही ही शोकांतिकाच म्हणावी सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच राजूभाऊ राठोड, माजी ग्रा.प.सदस्य संजय उईके, दिलीप उईके यांनी पीडित परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

13 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

13 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

13 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

13 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

14 hours ago