खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींना ठोकल्या बेडया भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :-१३/१२/२०२२ रोजी रात्री २२.३० वा ते २३.०० वा चे दरम्यान दुगड शाळेजवळ, सच्चाईमाता परीसर, आंबेगाव खुर्द, पुणे येथे प्रकाश निवृत्ती रेणुसे, वय २७ वर्षे रा. अटल १२, कावळे चाल, दुगड शाळेजवळ कात्रज, पुणे यास कोणीतरी अज्ञात इसमांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रॉडने व दगडांनी मारहाण केली असल्यामुळे त्यास ससुन हॉस्पीटल येथे उपचार करण्यासाठी अॅडमीट केले असता तो दिनांक १९/१२/२०२२ रोजी ससून हॉस्पीटल येथे मयत झाला आहे म्हणून अनिल प्रल्हाद भोसले, पोलीस हवालदार २२३०, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे यांनी सरकारतर्फे तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८४३ / २०२२, भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाहीजे आरोपी १ दत्ता राहुल कदम, २. अजय सदाशिव रेणुसे हे फरार होते. त्याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांना आरोपी दत्ता राहुल कदम, अजय सदाशिव रेणुसे हे जुना कात्रण बोगद्याजवळ थांबले असुन ते त्यांचे नातेवाईकांना भेटुन पुन्हा तेथुन जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज बोगद्याजवळ गेले असता तेथे आरोपी १. दत्ता राहुल कदम, वय २२ वर्षे, रा. साईलिला अपार्टमेंन्ट, साई मंदीराजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे २. अजय सदाशिव रेणुसे, वय २४ वर्षे, रा. गणपती मंदीराजवळ, अटल १०, आंबेगाव खुर्द, पुणे हे निळुन आल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये दिनांक ३०/०१/२०२३ रोजी १८.३० या अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा. श्रीमती सुषमा चव्हाण सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक चिरज गुप्ता, पोलीस अमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

8 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

8 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

9 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

9 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

9 hours ago