शुभम ढवळे मालेगाव तालुका प्रतिनिधी
वाशिम दि.9:- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी ८ ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील तोंडगाव परिसरात अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी वाशिम तहसीलदार श्री. साळवे प्रामुख्याने उपस्थित होते.
वाशिम जिल्हाचे जिल्हाधिकारी श्री षण्मुगराजन यांनी चंद्रभागा नदीला पूर असल्यामुळे नदीच्या अलीकडील काठावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.तोंडगाव येथील एका गर्भवती महिलेला बाळंतपणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी नदीला पूर असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका २० किमी अंतरावरून कन्हेरगाव मार्गावरुन पाठवून त्या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांच्या सूचनेवरून करण्यात आली.नदीला पूर असताना कोणीही प्रवाहातून रस्ता ओलांडू नये अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या. पुरामुळे कोणतीही जीवित हानी होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला यावेळी त्यांनी दिल्या.पुरामुळे झालेल्या नुकसानीची यावेळी त्यांनी पाहणी केली.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…