लेखक :- प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युज
जगभरात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांची संस्कृती, भाषा आणि अस्तित्व वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस आदिवासी जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो. पण असे फक्त दिवस साजरा केल्याने आदिवासी समुदायाचे प्रश्न सुटणार काय? हा एक कठीण प्रश्न आहे. डोंगर जंगल परिसरात राहणाऱ्या आदिवासी समुदाय आज पण प्रगती प्रथापासून कोसो दूर आहे.
भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली. आज भारत देश स्वतंत्राच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण आदिवासी समुदायाचे प्रश्न तसेच आहे. त्यात तिरमात्र फरक पडला नाही. आज देशातील 75 टक्के आदिवासी समाज अशिक्षित, गरीब आहे. आदिवासी क्षेत्रातील आरोग्य व्यवस्था तर नावाला उरली आहे. या देशात अनेक सरकारे आली आणि गेली पण काडीचाही फरक आदिवासी समाज जीवनात झाला नाही. केंद्र सरकार आन राज्यसरकार दर वर्षी आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोरोडो रुपयाचा निधी देतो, पण तो कुठे खर्च होते हे एक कोडे आहे. अगोदर जल जमीन आणि जंगलचा स्वामी हा आदिवासी समाज होता. पण आज सरकार द्वारा विविध प्रकारच्या प्रतिबंधक कायदामुळे आज आदिवासी समाजापासून त्याची जमीन जंगल हिसकले जात आहे. त्यामुळे हा आज निराश होऊन आपले जीवन जगत आहे.
धार्मिकता लादण्याचा प्रयत्न.
आदिवासी समाजाचे स्वतःचे असे वेगळे देव आहे. वेगळ्या चाली रिती आहे. प्रथा परंपरा वेगळ्या आहे, स्वतःची बोली आहे. निसर्गाचे संवर्धन हा त्यांचा प्रयत्न आहे. पण आज क्रिश्चन मिशनरी त्यांच्या अध्यानाचा फायदा घेऊन आणि काही पैशाचे आमिष दाखवून त्याचे धर्मांतरण करत आहे. तर काही हिंदू धर्माचे संघटना आदिवासी हिंदू आहे असे ओरडत आहे. हे सर्व आप आपली रोटी तव्यावर शेकत आहे.
जेव्हा कुठल्याही देशाचा विकास किती झाला हे बघायचं असेल तर, त्या देशातील शेवटचा नागरिक समुदायाच्या विकास किती झाला त्यावरून ठरवावे लागेल. आज ज्याचे पोट भरले आहे तो तुपाशी आणि ज्याला काही नाही मिळत आहे तो फक्त उपवासी आहे. त्यामुळे आज आदिवासी समाजात कुपोषणाचे प्रमाण खूप जास्त आहे. रोज अनेक मुल कुपोषणाने मरत आहे आणि आपण फक्त विकासाच्या गोड गप्पा करत आहोत.
23 डिसेंबर 1994 च्या ठराव 49/214 द्वारे, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने निर्णय घेतला की जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी लोकांच्या आंतरराष्ट्रीय दशकात साजरा केला जाईल. दिनांक 1982 मध्ये, मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणावरील उप-कमिशनच्या स्वदेशी लोकसंख्येवरील यूएन वर्किंग ग्रुपच्या पहिल्या बैठकीचा दिवस आहे.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…