चंद्रपूर: गॅस्ट्रो सदृश्य परिस्थिती असलेल्या गावांमध्ये तात्काळ कार्यवाही करण्याच्या सीईओंच्या सुचना.

जिल्हतील सर्व ग्रामपंचायत व पंचायत समितीला निर्देश.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
चंद्रपूर,दि.9 ऑगस्ट:-
राजुरा तालुक्यातील देवाडा व काही गावांमध्ये गॅस्ट्रोची लागण झाली असता तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही रुग्णांचे 7 स्टूल सॅम्पल प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. पाईपलाईन व वॉल गळतीमुळे पाणी दूषित झाले असून या गावांमध्ये अतिसार आजाराचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे अशा गैस्ट्रो सदृश्य परिस्थिती असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिल्या आहे.

सदर कार्यवाहीबाबत गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविणे, ब्लिचिंग पावडरची तपासणी, ग्रामपंचायत स्तरावर क्लोरीनेशन व साफसफाई करण्याच्या सूचना, शेणखते व उकिरडे गावाच्या हद्दीपासून 100 मीटर अंतरावर स्थानांतरित करणे तसेच पाण्याच्या टाकीखाली मुख्य व्हॉल्वमध्ये कोणत्याही प्रकारची गळती असल्यास त्वरित बदलविण्यात यावे, अशा सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी दिल्या.

गत आठवड्यात देवाडा गावामध्ये एकूण 78 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. टेंभुरवाही येथे 35 जणांना गॅस्ट्रोची लागण तर एक मृत्यू, सोंडो या गावांमध्ये 25 जणांना गॅस्ट्रोची लागण तर सिंदेश्वर या गावामध्ये एकूण 70 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गॅस्ट्रोवर प्रतिबंधात्मक उपाय :

नागरिकांनी पाणी उकळून गार केलेले अथवा मेडिक्लोरचा (जीवनड्रॉप) वापर केलेले प्यावे. स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवायला वाढतांना किंवा जेवतांना हात स्वच्छ धुवावेत. अन्न नीट झाकून ठेवावे, ताजे अन्न खावे, शिळे अन्न खाणे टाळावेत. शौचालयावरून आल्यावर, बाळाची शी धुतल्यावर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत. शौचासाठी शौचालयाचा वापर करावा. पाण्याच्या स्त्रोताजवळ शौचालयास बसू नये. घरात कोणाला उलट्या, जुलाब होत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. जुलाब होत असतांना देखील 6 महिन्याखालील बाळाला अंगावरील दूध पाजणे थांबवू नका. रुग्ण दवाखान्यात पोहचेपर्यंत ओ.आर.एस द्रावण योग्य प्रमाणात पाजत रहा. लहान मुले व गरोदर माता आणि वृद्ध लोकांची विशेष काळजी घ्या. त्यांना साथ संपेपर्यंत उकळून गार केलेले पाणी पिण्यासाठी द्या, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

4 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

4 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

4 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

4 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

4 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

4 hours ago