बीड जिल्हा शल्य चिकित्सकांकडून गेटवरच हजेरी; लेट लतीफ कर्मचाऱ्यांची उडाली ताराबंध.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आपण अनेक शासकीय रुग्णलयांमध्ये लेटलतिफीचे अनेक दा बघितलं असेल. त्यामुळे बीड येथील जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून लहान- मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी अनेक वेळा कडक भूमिका घेतली. त्यामुळे संपूर्ण जिल्हा रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.

आज सोमवार सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य गेटवरच किती कर्मचारी उशिरा येतात याची नोंद घेत नऊ ते साडेदहा पर्यंत सर्च ऑपरेशन राबवले. यामध्ये तब्बल 145 कर्मचारी उशिरा येत असल्याचे पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांनी वेळेवर येणे अपेक्षित आहे, मात्र दहा-साडेदहा वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची येजा सुरूच होती. उशिरा येणाऱ्या तब्बल 145 कर्मचाऱ्यांचा अर्धा दिवसाचा पगार कपात करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी दिले आहेत.

यामध्ये दोन्ही आर एम ओ, डॉ. संतोष शहाणे, डॉ. राम आव्हाड यांच्यासह डॉक्टर, नर्स, कार्यालयीन कर्मचारी व आरोग्य सेवेतील कर्मचारी यांची उशिरा येण्याची नोंद झाली.आज (सोमवारी) सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या गेटवरच उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची डॉ.सुरेश साबळे यांनी हजेरी घेतली. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र यामुळे तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या आधीसेविका मेट्रन रमा गिरी यांची उपस्थिती होती.

मुख्य गेटवर कारवाई सुरू असल्याने दुसरे गेट बंद करण्यात आले होते. मात्र काही कर्मचाऱ्यांनी आपली गाडी बाहेर पार्क करत भिंतीवरून उडी मारून आत मध्ये येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची देखील उशिरा आल्याची नोंद करण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून असा हलगर्जीपणा केला जात असेल, तर यापुढे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

6 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

6 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

7 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

7 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

7 hours ago