मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिकः- नाशिक शहरामधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. टवाळखोरांना कायद्याचा किंवा पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा संतप्त सवाल नाशिकमध्ये विचारला जात आहे.
याचं कारण म्हणजे नाशिकच्या अंबड परिसरात बहीण आणि भावावर टवाळखोर गुंडांनी धारधार शस्राने हल्ला केला आहे. क्लासवरुन बहीण घराच्या दिशेने येत असतांना रस्त्यातच तीची काही तरुणांनी अश्लील हावभाव करत छेड काढली . बहीण प्रीती भुजबळ हिने आपला भाऊ उमेश भुजबळ याला याबाबत सर्व माहिती दिली. भावाने बहिणीला सोबत घेऊन जात जिथे हा प्रकार घडला तिथेच असलेल्या टवाळखोरांना जाब विचारला. मात्र, जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाऊ आणि बहीणीवर थेट कोयत्यानेच हल्ला करण्यात आला.
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुरकुले हॉल याठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. जाब विचारायला गेलेल्या बहीण भावावर टवाळखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहे. बहिणीची छेड काढली म्हणून भावाने टवाळखोर गुंडांना गाठले होते. टवाळखोर यांना माझ्या बहिणीची छेड कुणी काढली असा जाब विचारताच एकाने जवळ असलेला कोयता काढला आणि वार सुरू केले.
जवळच असलेली बहीणही भावावर वार सुरू झाल्याचे पाहून घाबरली. त्यावेळी तीने टवाळखोरांना अडवून भावाला वाचविण्याचा प्रयत्न करत केला मात्र, टवाळखोरांनी तिच्यावर सुद्धा हल्ला केला.
टवाळखोरांच्या हल्ल्यात भाऊ आणि बहीण दोघेही गंभीर जखमी झाले आहे. दोघांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. जखमी बहीण आणि भावाने टवाळखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात जखमी बहीण आणि भावाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या सिडको परिसरात घडलेल्या या घटणेनंतर संपूर्ण शहर हादरलं असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना यानिमित्ताने निर्माण झाली आहे. सर्रासपणे टवाळखोरांकडे धारधार शस्र आढळून येत आहे.
नाशिक शहरात विविध ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतांना टवाळखोरांकडे कोयता, पिस्तूल यांसह धारधार शस्र आढळून येत असल्याने नागरिकांकडून पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
नाशिक शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे गुन्हेगारीवर अंकुश कधी ठेवणार अशी चर्चा होऊन संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348