पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-विमानतळ पो स्टे गुन्हा रजि. नं. ६४ / २०२३, भा. दं.वि. कलम ३८६.३८७, ३४१, ३४ या गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे हे करित असताना मा. पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी वेळोवेळी उदयोजक, व्यावसायिक यांना खंडणीखोर गुन्हेगार यांचेविरुध्द निर्भयपणे तक्रार देणेबाबत आवाहन केले होते.
फिर्यादी हे फिनिक्स मॉल विमाननगर, पुणे येथील शो-रुमचे इंटर रिन्युवेशनचे काम दि. ०६ / १२ / २०२२ रोजी करीत असताना, सदर कामासाठी लागणारे प्लायवुडचा भरलेला ट्रक फिनिक्स मॉल विमाननगर, पुणे येथे आलेला असताना, रवि ससाणे व त्याचा साथीदार मंगल सातपुते, रा. लोहगाव पुणे यांनी ट्रक मधील प्लायवुड फिर्यादी यांचे कामगारांना खाली करू न देता त्यांची अडवणुक करून, आम्ही येथील स्थानिक आहोत असे सांगुन तेथे काहीएक काम न करता फिर्यादी यांचेकडे ८ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली, त्यावेळी तडजोडीअंती ४,५०,०००/- रुपयेची मागणी करुन फिर्यादी यांचेकडून चेकव्दारे त्यांनी स्वतःचे खात्यावर २ लाख रुपये स्वीकारुन उर्वरीत २,५०,०००/- रुपयांसाठी फिर्यादी यांना भेटून तसेच फोनव्दारे जीवे मारण्याची सतत धमकी देत असल्याने, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी तक्रार देणेबाबत केलेल्या आवाहनाला उदयोजक, व्यावसायिक यांनी प्रतिसाद देवुन फिर्यादी यांनी त्यांचेविरुध्द तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची तात्काळ दखल मा अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल झेंडे यांनी घेवुन त्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार इसम नामे १) रविद्र ऊर्फ रवि जयप्रकाश ससाणे, रा. चंदननगर पुणे २) मंगल सातपुते, रा. लोहगाव, पुणे यांचेविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ७६/२०२३, भा.दं.वि. कलम ३८६, ३८७,३४१,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. नमूद गुन्हयातील आ. क्र. १ हा विमानतळ पो स्टे गुन्हा रजि. नं.६४/२०२३. भा. दं.वि. कलम ३८६.३८७,३४१, ३४ या गुन्हया मध्ये पोलीस कस्टडी मध्ये असुन तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक -२, गुन्हे शाखा, पुणे, पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार, विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेगडे, राहुल उत्तरकर सदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, चेतन शिरोळकर तसेच महिला पोलीस अंमलदार, आशा कोळेकर यांनी केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…