पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सौरभ सुनिल पवार, वय- १९ वर्षे, रा. गोसावी वस्ती कर्वेनगर पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०२ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन त्यांनी फिर्यादी हे त्यांचा मित्र अमित धनवे असे दोघे कामावरून घरी जात असताना, इसम नामे सौरभ पवार, राहुल चव्हाण आणि कुमार चव्हाण यांनी जबरदस्तीने अडवून सौरभ पवार याने फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशातील रोख रूपये ९६०/- जबरदस्तीने काढून घेत असताना फिर्यादीने त्यास विरोध केला असता राहुल चव्हाण याने बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी फिर्यादी व त्यांचे मित्रास शिवीगाळ व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून पोलीसांत तक्रार केली तर जीवे ठार मारील अशी धमकी दिली म्हणुन वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.३८ / २०२३, भा.दं.वि.क. ३०७, ३९७,३४१, ३२३, ५०४, ५०६, ५०६ (२), ३४, क्रि. लॉ. अमे. अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) सौरभ सुनिल पवार वय १९ वर्षे, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे (टोळी प्रमुख) २) राहुल गणेश चव्हाण, वय २० वर्षे, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे ३) कुमार चव्हाण वय-२९ वर्षे, रा. मावळे आळी, कर्वेनगर, पुणे (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी सौरभ सुनिल पवार ( टोळी प्रमुख) ज्याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून गुन्हे केलेले असुन त्यांनी अवैध मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, नागरिकांच्या गालगत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. हाके यांनी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०३, पुणे श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री राजेंद्र डहाळे यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८ / २०२३.भा.दं.वि.क. ३०७, ३९७,३४१.३२३, ५०४, ५०६, ५०६ (२). ३४.क्रि. लॉ. असे अॅक्ट कलम ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ ( २ ) ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०३, पुणे, श्री.सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे, श्रीमती रुक्मिणी गलंडे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. हाके पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दत्ताराम बागवे, निगराणी पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, मनोज बागल व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १२ वी कारवाई आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…