अवैधपणे चालणाऱ्या गावठी हातभटटी वारुच्या अहयाचे लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडुन करण्यात आले समुळ उच्चाटन एकुण ८८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला नष्ट

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रितेश कुमार, सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक सो व अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा सो यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुदध गुन्हे करणारे व लोकामध्ये दशहत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५, श्री विक्रांत देशमुख सो यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणे बाबतचे आदेश देऊन सदर कारवाई बाबत मार्गदर्शन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील अधिकाऱ्यांना केले. त्यानंतर श्री. दत्तात्रय चव्हाण, वपोनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे यांनी सदर अवैध घदयांबाबत माहिती घेतली ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जात नाही अशा ठिकाणी जंगलामध्ये निर्जनस्थळी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे काम राजरोसपणे चालू असलेबाबत त्यांना माहिती मिळाली.

सदर बातमीचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कडील अधिकारी, अंमलदार, तसेच परिमंडळ ४ व ५ कडील आ सी पी पथक व उत्पादन शुल्क विभागाकडील अधिकारी व स्टाफ यांचे सोबत चर्चा करून नियोजनबद्ध दोन पथके तयार करून लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात सोरतापवाडी, शिंदवणे, लोणीकाळभोर मांडाळमळा येथील अवैध गावठी हातभट्टी दारु भट्टीवर धडक कारवाई करुन काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे येथील गावठी हातभट्टीवर कारवाई करून जमिनित खड्डे करून अंदाजे चार हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे चार पत्र्याचे भांडे असे अंदाज ४४०००/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट केला. त्याचवेळी दुस-या पथकाने मांडाळमळा, रूपनरवस्ती, लोणी काळभोर या ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी दोन पञ्याचे टाक्यामध्ये तसेच जमिनीत खड्डा करून काळे रंगाची ताडपत्री अंथरून त्यामध्ये साठवलेले अंदाजे ३००० लिटर गुळ, तुरटी व पाणी मिश्रित असलेले कच्चे रसायन हातभट्टीसमोर पडलेली जळावू लाकडे, पञ्याच्या टाक्या इत्यादी साहित्य पोलीसांनी जागिच नष्ट केले आहे. याप्रमाणे कारवाई करून अंदाजे एकुण ८८,०००/- रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा व दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान गावठी हातभट्टी चालवणारे इसम नामे १) राहुल व्यंकट राठोड, वय २७ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिदावणे, ता. हवेली, जि. पुणे २) पंकाबाई व्यंकट राठोड, वय ५२ वर्षे, धंदा घरकाम, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे, ता. हवेली, जि.पुणे ३) जयश्री कांतीलाल राठोड, वय ३५ वर्षे, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे, ता. हवेली, जि.पुणे, ४) सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ, वय २६ वर्षे, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे. यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त सोो. हडपसर विभाग, श्री दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोउपनि वैभव मोरे, पोहवा / ४३२ गायकवाड, पो. हवा बोरावके, पोना / ७३३५ नागलोत, पो.ना ६५०३ साळुंखे, पो. ना. ७६९५ जाधव, पो.ना. राठोड, पोशि पवार, पोशि कुदळे, पोशि/ १२००५ शिरगीरे, पो. शि३२९ विर, मपोशि फणसे, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, आरसीपी ४ व आरसीपी ५ तसेच राज्य उत्पादन शुल्क जी विभाग पुणे यांचेकडील अधिकारी व स्टाफ यांच्या पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

7 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

8 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

9 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

9 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

9 hours ago