पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहरात वास्तव्यास असलेले फिर्यादी विद्यमान आमदार यांचा मोबाईल क्रमांक आरोपींनी सोशल मिडीया वरून प्राप्त करून घेवून फिर्यादी यांचेशी व्हाट्सअॅप वर संपर्क करून त्यांना वेळोवेळी अश्लिल संदेश पाठवले तसेच अश्लिल व्हिडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. रेकॉर्ड केलेला व्हिडीओ कॉल फिर्यादी यांचे फेसबुकवर असलेले मित्र यांना पाठविण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना १ लाख रूपये इतक्या रकमेच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली मागणी केलेली रक्कम तात्काळ दिली नाही तर रेकॉर्ड केलेला अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी फिर्यादी यांना दिल्याने सायबर पोलीस स्टेशन येथे गुरजि.नं. ०५/२०२३. भा. द. वि. कलम ३८४ ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना संपर्क करण्याकरिता वापरलेला मोबाईल क्रमांक याचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर गुन्ह्यातील आरोपी हे भरतपुर राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न झाले. सदर

आरोपीचा शोध घेणेकामी सायबर पोलीस स्टेशन कडील १ पथक भरतपूर, राजस्थान येथे पाठविण्यात आले असता त्यांनी भरतपूर, राजस्थान येथे जाऊन शोध घेतला असता पथकास आरोपी नामे रिझवान अस्लाम खान वय २४ वर्षे, रा. ग्राम सिहावली महारायपूर, ता. नगर, जि. भरतपूर राजस्थान, हा मिळून आल्याने त्याचेकडे केले प्राथमिक तपासात त्याचा सदर गुन्ह्यात सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दि.०९/०२/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून एकूण ०४ मोबाईल संचे व ०४ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईल संचामध्ये स्क्रिन रेकॉर्ड केलेल्या एकूण ९० अश्लिल व्हिडीओ मिळून आल्या आहेत. सदर अटक आरोपीस मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक बलमिंग ननवरे करीत आहेत. पुणे शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, मोबाईल नं. ७७४२६७०३५८,८८६५०२४८६२,८००१९७०१७८,९५८७३४२८२८ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे मागितले असल्यास किंवा गागत असल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे शहर या कार्यालयात किंवा ७०५८७१९३७५ ७०५८७१९३७१ यावर संपर्क करावा.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कणिक, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर श्री. विजयकुमार पळसुले त्यांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुगे-पाटील, सहा पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे, पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव, राजकुमार जाबा, शिरीष गावडे, श्रीकृष्ण नागटिळक, संदिप यादव, प्रविणसिंग राजपुत, पुजा मांदळे यांचे पथकाने

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

13 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

1 day ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

1 day ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

2 days ago