यवतमाळ: आधार कार्ड नव्हत म्हणून बाळंतपणासाठी आलेल्या गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवलं.

निलेश पत्रकार, प्रतिनिधी
यवतमाळ:-
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे भोंगळ कारभार सुरू आहे. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले पण ग्रामीण भागातील रुग्णालय हिटलरचे काम करत आहे. अशीच एक हिटलशाही यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रूग्णालयाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. एका नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला बाळंतपणाच्या प्रसूतीकळा सुरु झाल्या. त्यामुळे त्या महिलेला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. पण या महिलेला ग्रामीण रुग्णालयातून चक्क परत पाठवण्यात आल्याने एकच क्रूरतेचा कळस गाठला आहे. या महिलेला ग्रामीण रुग्णालयातून परत का पाठवलं, याचं कारणही अत्यंत संतापजनक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधार कार्ड नाही म्हणून या महिलेला ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्यांनी तिला परत पाठवून दिलं. तसंच गरिबीमुळे या महिलेकडे पैसेही नव्हते. अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत असताना या महिलेला मदत करायची सोडून या महिलेला परत पाठवण्यात आल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये घडली. दरम्यान, सुदैवानं काही सजग सामाजिक कार्यकर्ते या महिलेच्या मदतीसाठी धावून आल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. अर्चना सोळंके असं या गरोदर महिलेचं नाव आहे. मंगळवारी ही घटना घडली.

‘आधार’ ने केले निराधार..
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 9 महिन्याची गरोदर महिला प्रसुती कळा सुरु झाल्या म्हणून दाखल व्हायला आली. पण तिच्या कडे आधार कार्ड नसल्यानं तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी साफ नकार दिला, असा आरोप कऱण्यात आला आहे. आधार कार्ड नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची प्रसूती केली नाही, असं सांगितलं जातंय. महिला गरीब असल्यानं तिच्याकडे प्रसूतीसाठी पैसे नव्हते. अखेर या महिलेच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते धावून आले. त्यांनी तातडीन पैसे गोळा करुन तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं.

त्या गरीब महिलेला गावातील लोढा

रुग्णालयात या गरीब आणि संकटात सापडलेल्या महिलेची अखेर सुखरुप प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म ही दिली. पण घडलेल्या निंदनीय प्रकारावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. गरीब महिलेला प्रसूतीसाठी नाकारणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

23 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

54 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago