पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं ११७/२०२३ भादवि कलम ४५७,४५४,३८० मधील फिर्यादी नामे आदेश दिलीप सातव, वय ३५ वर्षे, रा. सावता माळी तालीम शेजारी, नारळीचा वाडा, उरुळी देवाची, ता. हवेली जि. पुणे यांच्या सर्वे नं. २३२/१ अ. रिव्हाइझ नावाचे स्क्रॅपचे दुकानामध्ये, होळकरवाडी रोड, उरुळी देवाची, ता. हवेली जि. पुणे या ऑफिसचे मेनगेटचे व दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करुन ऑफिसमधील एलइडी टि.व्हि तसेच एच.पी कंपणीचा लॅपटॉप, आयबॉल कंपणी लॅपटॉप व रिअल मी कंपणीचा टॅब अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन चोरी केल्याने सदर आरोपीतांचा शोध घेणेकामी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, दत्तात्रय चव्हाण यांनी पोउपनि गोरे व तपास पथकातील अंमलदारांना आदेशीत केल्याने त्या अनुशंगाने अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असता तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “ऊरुळी देवाची परीसरामधील घरफोडी करणारा इसम हा ऊरुळीदेवाची हांडेवाडी चौक येथे येणार आहे त्यांचे अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट असुन निळे रंगाची जिन्स घातली आहे’ वगैरे माहीती मिळाल्याने सदरचा आरोपी हा लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं ११७/२०२३ भादवि कलम ४५७,४५४, ३८० प्रमाणे दाखल गुन्ह्यात पाहीजे आरोपी असल्याने आम्ही सदर बाबत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण साो यांना कळविले असता त्यांनी सापळा रचुन सदर आरोपीस ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन केल्याने त्या प्रमाणे आम्ही वरील प्रमाणे स्टाफ घेवुन हांडेवाडी चौक येथे सापळा रचुन थांबलो असता दिनांक ०८/०२/२०२३ रोजी १९/०० वा चे सुमारास बातमीदाराने वर्णन सांगीतल्या प्रमाणे एक इसम व त्याचे सोबत गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची नाइट पॅन्ट घातलेले दोन इसम हांडेवाडी चौकात आले त्यावेळी आम्ही वरील स्टाफचे मदतीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नाव १) शिवाजी नामदेव पल्लेवाड, वय २२ वर्षे, धंदा मजुरी, रा. सध्या रा. कापरे बिल्डींग, हांडेवाडी, ता. हवेली, जि. पुणे मुळ रा. डोनगांव, ता. औराद, जि. बिदर राज्य कर्नाटक २) गणेश उत्तम उमाप, वय २३ वर्षे, धंदा पेंटर, रा. हाडेवाडी चौक, ता. हवेली, जि.पुणे मुळ रा. अंतरवली, ता. गेवराई, जि.बीड असे असल्याचे सांगीतले. सदर आरोपीतांचे रेकॉर्ड चेक केले असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे दिसुन आल्याने त्यांचे कडे कसून तपास केला असता त्यांनी उरुळी देवाची परीसरामध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कडुन एलइडी टि.व्हि तसेच एच.पी कंपणीचा लॅपटॉप, आयबॉल कंपणी लॅपटॉप व रिअल मी कंपणीचा टॅब, तोशिबा कंपणीचा १६५ इंची एलइडी टि.कि, सोनी कंपणीचा होम थेअटर इत्यादी दाखल गुन्हयातील जप्त करण्यात आली असून लोणीकाळभोर पोलीस स्टेशन अभिलेखावरील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी है पोलीस कस्टडीमध्ये असून अधिक तपास सुरु आहे.
(१) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं ११७/२०२३ भादवि कलम ४५७, ४५४, ३८०, ४२७,३४(२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं ३५/२०२२ भादवि कलम ४५७, ४५४, ३८०, ४२७, ३४
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. रितेशकुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा.विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई सहा. पोलीस आयुक्त साो, हडपसर विभाग, मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, मा.सुभाष काळे पोलीस निरीक्षक सो, (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि गोरे, प्रमोद हंबीर व त्यांचे सोबत पो.हवा पोहवा / ४३२ गायकवाड, पो.हवा / २४३४ बोरावके, पो ना/ ७६९५ जाधव, पोना / ७३३५ नागलोत, पो.ना / ६४८२ देवीकर, पो.शि/ १०३७२ पवार, पोशि/ १२००५ शिरगीरे, पोशि/ ४७११ कुदळे, पोशि/ ३२९ वीर, मपोशि विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…