मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हाधिकारी हे शासनाचे जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनीधी असल्याने सर्वसाधारण जनता आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे जात असते परंतु गडिरोलीच्या जिल्हाधिका-यांकडे गेले असता जाणा-यांना त्यांच्याकडून अपमानजनक वागणूक दिली जात असल्याने अशा असंवेदनशील जिल्हाधिकारी संजय मिना यांना तात्काळ हटविण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
शिवसेना पक्षाचे उध्दव बाळासाहेब ठाकरे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांनी सर्किट हाऊस येथे भेट घेऊन जिल्हाधिकारी हटावचे निवेदन दिले व जिल्हाधिका-यांच्या हुकूमशाही व अरेरावीपणावर सविस्तर चर्चा केली. दानवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सामाजीक व राजकिय कार्यकर्ते संविधानिक अधिकार व हक्कासाठी लोकशाही मार्गाने जिल्हाधिका-यांना भेटावयास वा निवेदन देण्यास गेले असता जाणा-यां व्यक्तींशी उध्दटपणे अरेरावीची भाषा बोलून हुसकावून लावत असल्याचे अनूभव जिल्ह्यातील अनेक सामाजीक – राजकिय कार्यकर्ते व पत्रकार यांना सुध्दा आले आहे .
नुकतेच समाज कल्याण अंतर्गत शहरातील वसतीगृहात राहणा-या शेकडो विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्तांकडून समस्या मार्गी न लागल्यामूळे जिल्हाधिका-यांना संवेदनशिल समस्या घेऊन भेटावयास गेले असता तुम्ही येथे कशाला आलेत, तुम्ही पुण्या मुंबईला जा , समाज कल्य़ाण माझ्या अखत्यारीत येत नाही अशी अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली व त्यांना हुसकावून लावले.
जर जिल्ह्याचे मुख्य जिल्हाधिकारीच दाद देत नसतील व अत्यंत संवेदनशिल समस्यांवर असंवेदनशीलपणा दाखवत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसहीत सर्वसामान्यांना पडला आहे त्यामूळे असंवेदनशील पणाचा कळस गाठणा-या जिल्हाधिका-यांना तात्काळ हटविण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा जिल्हाधिकारी हटविण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे हे विशेष.
निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, संगटक भिमराव शेंडे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, युवा नेते चंदू नैता़म, मिडीया प्रमुख जावेद शेख, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, भोजराज रामटेके, दिलीप बांबोळे, भारत रायपूरे, सोमनाथ लाकडे, मुकेश शेंडे, रवी निकोडे, दिपक कोसमशिले, जानकिराम भुरसे, गोविंदा शेंडे, प्रभाकर जुनघरे, पुरुषोत्तम नंदगिरवार आदि उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…