नागपूरात रानभाजी महोत्सव थाटात साजरा. माजी मंत्री सुनील केदार यांचे हस्ते झाले उद्घाटन.



देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका, जिल्हा नागपूर.

नागपूर:- श्रावणात भूमी हिरवागार शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. नद्या-नाले वाहत असतात. धबधबे तर किती बघू आणि किती नको असे वाटत असते. भातलावणीची कामे कापूस कामे सुरू झालेली असतात.अश्या वेळेस आदिवासी दिनानिमित्त दि.10/08/22 ला सरपंच भवण,सिव्हिल लाईन,नागपूर येथे जिल्हा स्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला मा.नामदार सूनीलबाबु केदार, पशू संवर्धन व क्रीडा मंत्री.नागपूर,जिल्हा परिषद अध्यक्ष, मा.रश्मी ताई बर्वे, मा.कृषी सभापती, श्री.तपेश्वर वैद्य, मा.श्रीमती. कुंदाताई राऊत, श्रीमती. नागपुरे ताई,सर्व जिल्हा परिषद सदस्य, मा.प्रकल्प संचालक, आत्मा श्रीमती.डॉ.नलिनी भोयर, मा.विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी,श्री.मिलिंद शेंडे, मा.उप.प्रकल्प संचालक,श्री.शिवणकर, श्री प्रशांत शेंडे,सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक,सर्व आत्माचे कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमांमधून रानभाजी चे महत्व सागण्याचे व संदेश देण्यात आले… कुपोषन मुक्तीमध्ये या भाज्यामधील घटकद्रव्यांचा आवर्जुन विचार करायला हवा हा आग्रही वाढत आहे. पावसाळयात जंगलात, डोंगराळ भागामध्ये व शेतशिवारात या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदीवासी महिला व ईतर शेतकरी बाजारात त्या विक्रीसाठी घेवून येतात. यातील काही भाज्यामध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत तर त्यातुन विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे यातील काटेरी प्रकारातल्या काही भाज्या काढल्यावर त्या खडयांचे मिठ घालुन उकळवून घेतल्या जातात. काही रानभाज्याच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरुन त्यांची विषारी- बिनविषारी गटात वर्गीकरण केले जाते.
रानभाज्याबदल पुरेशी माहिती नसल्यामुळे ईच्छा असूनही अनेकाकडून त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेतांना शक्यतो स्थानिक आदिवासीकडून त्या घ्याव्यात त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना या भाज्याविषयी जास्त अचुक माहिती असते. ज्या भाज्यामध्ये पानाचा समावेश अधिक आहे या भाज्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकडून ते पाणी टाकुन द्यावे त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यामधील अंगभुत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पध्दतीने वाढलेल्या असतात त्यामुळे यात खते किंवा किटकनाशके वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही उकडून केलेल्या भाज्यामध्ये शक्येतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.

कोंब आलेली भारंगी, शेकट्याच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात

रानभाज्याचे मध्ये क्लोरोफिल नावाचे घटकद्रव्य भरपूर प्रमाणात असते ते पचनसंस्थेसह शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते. या ऋतुमध्ये रानभाज्याचे सेवन केल्यामुळे त्याचे शरीराला दिर्घकाळ आरोग्यदायी लाभ होतात. काही भाज्या थंड तर काही भाज्या उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळी सारख्या रानभाज्या आवर्जुन खालल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर रानकेळ्यामध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळयाची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट तुरट चविची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्याच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूच ची भाजी ही गवतासारखी असते त्यामुळे या अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात हा फरक सरावाने ओळखता येतो. शेवळ म्हणजे पांढऱ्या मशरुमचाच एक महत्वाचा प्रकार आहे. यात सेक्रोमायसीस इस्ट अधिक असते. अन्य भाज्यामध्ये ही या इस्टचा नैसर्गिक थर असतो.या भाज्यामध्ये लोह, खनिज यांचा भरपूर संक्रोमायसीसच्या अतिरिक्त थरामुळे घशात खवखव होते. खाज आल्यासारखे वाटते. त्यामुळे या भाजीसोबत विक्रीला ठेवली जाणारी फळे ही विकत घ्यायला हवित. त्यामुळे खवखवीसारखी लक्षणे नष्ट होतात. या भाज्यामध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्याचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसात शाकाहारी वा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घ्यायला हवा.भाज्यामध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅलशियम यांचे प्रमाण अधिक असतेऔषधी गुणधर्म देखील आहेत पातेरे, भारंग, बिडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. ज्या रानभाज्या पानाचा रंग गडद असतो. त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र त्यात पोष्टीक गुणधर्मही अधिक असतात या भाज्याही उकडून शिजवल्या जातात करटोली सारख्या काटेरी फळ असणा-या भाजीमध्ये नैसर्गिक जिवणसत्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा माळा, पुननवर्वा, कडू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकनेरी, भोवरी या सारख्या भाज्यामध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅलशियम यांचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. भारंगीची भाजी ही नविन फुटलेल्या कोंबाच्या व पानाच्या स्वरुपात असते. यात प्रोटीन्सही भरपूर असतात टाकळयाची भाजी ही मेथीच्या भाजीसारखी असते. टाकळयाची पानाचा लेप विविध त्वचा विकारावर लावतात. या भाजीला ‘तखटा’ असे ही म्हणतात.या भाज्यात करटोलीबाफळी, हेळू, कडमडवेली, आघाडा, गुळवेल, नळीची भाजी, मायाळू, सुरन कंद, केणा,अळू, शेवगा आदी रानभाज्या विविध रोगावर गुणकारी ठरल्या आहेत.तसेच रानभाज्यत्याचे आहारामध्ये सेवन करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते.
रान भाजीपाला महो्सवानिमित्त हिंगणा तालुक्या तील प्रामुख्याने अन्नदाता शेतकरी स्व सहाय्य गट, कान्होलिबारा, नेरी मानकर, अडेगाव कवडस, मंगळूर येथील महिला बचत गटांचा विशेष सहभाग लाभला, रानातील भाजीपाला याचे विक्री करण्यात आली

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago