शिवाजी महाराज जयंती निमित्त पत्रकार संघाचा मेळावा व साप्ताहिक ‘स्वतंत्र विदर्भ की ताकत’ या साप्ताहिकाचा 9 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पत्रकार संघाचा मेळावा व साप्ताहिक ‘स्वतंत्र विदर्भ की ताकत’ या साप्ताहिक पत्राचे ०९ वा वर्धापन दिन सोहळा स्थानिक पंचायत समिती सभागृह हिंगणघाट येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले, प्रमुख पाहुणे म्हणून कृ.उ.बा.समिति चे सभापती अँड.सुधीर कोठारी, न.पा. मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मो. रफिकभाई,युवा-संस्कार मासिकाचे संपादक प्रदीपकुमार नागपुरकर,सुनिल डोंगरे, कौसर अंजूम आदी मान्यवर प्रामुख्याने मंचसिन होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना अँड. कोठारी म्हणाले कि या देशाचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार व त्याची लेखनी हि एक नवीन आयाम देत असते जसे छत्रपति शिवाजी महाराज यांनी आपल्या कौशल्याने व जिद्दीच्या मावळा सवंगडीचे साथीने स्वराज्य निर्माण केले तीचं प्रेरणास्रोत आपल्या कार्यात विविध सत्कारमुर्ती यांनी घ्यावी, व अधिक जोमाने कार्य करावे अशी भावना व्यक्त केली. तर अध्यक्षस्थानवरुन बोलतांना अतुल वांदिले म्हणाले कि सद्याचे राजकारणात युवा पिढीने विचारपूर्वक राजकारण करावे तरचं आपण आपले अस्तित्व टिकवून ठेऊ शकतो, प्रसंगानुकूल मुख्याधिकारी गायकवाड़, प्रदीपकुमार नागपुरकर, मोहम्मद रफीक, सुनिल डोंगरे, यांचे भाषणे झालीत. याप्रसंगी शहरातील व ग्रामीण भागातील आशा सेविका, आरोग्य सेविका, सरपंच तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या ७१ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, नन्नाशाह दर्गा अध्यक्ष अनवर भाई, पत्रकार राजेश कोचर, केशव तितरे, सुरेंद्र बोरकर, मोतीराम मुन, रामभाऊ मेंढे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सुनिता माळवे, कदीर बक्श, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख इस्ताक यांनी केले होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

4 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

6 hours ago