विक्की एस डोके, लाखांदूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लाखांदूर:- तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी सापडून एका महिलेचा गुरफडू न मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी सकाळी 1:00 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे घडली. शीतल धर्मशील कोचे वय 45 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.
सध्या भंडारा जिल्ह्यात उडीद, सोयाबीन, वाटाणा, हरभरा अशा विविध पिकांची काढणी करून त्याची मळणी करणे सुरू आहे. विशेषतः लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धान पिकाची रोवणी करण्यासाठी लगबगीने शेत जमिनीची मशागत करणे सुरू असल्याने पिकांची काढणी सुरू झाली आहे. अशातच आज सोमवारी सकाळी शीतल धर्मशील कोचे यांच्या स्वतःच्या शेतातील उडीद पिकाची मळणी करण्यासाठी रुपचंद रामदास बगमारे यांची ट्रॅक्टर सह मळणी यंत्र सुरू होते. यावेळी शीतल मळणी यंत्र व ट्रॅक्टरच्या मधोमध उभी असताना तिची साडी लोखंडी सॉफ्टिंग ला अडकून त्यात गुरफडल्याने शितलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती गावात पोहचताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत एकच गर्दी केली. लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, बीट जमादार दुर्योधन वकेकार व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी रूग्णालयात पाठविण्यात आले असून लाखांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. शीतलच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…