आरोग्य उप संचालक महिला अधिकाऱ्याला जडला होता लाचेचा भस्म्यारोग, पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर :-
येथून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करण्‍यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना कोल्हापूर मध्ये आरोग्य उप संचालक पदावर कार्यरत असलेल्या महिला मुख्य प्रशासकीय अधिकारीला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. भावना चौधरी असे सदर लाच घेणारी अधिकारी हीचे नाव असून ती कोल्हापूर येथील आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी कार्यरत आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भावना चौधरी या लाचखोर महिलेला अटक केली आहे. तक्रारदार याचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम प्रलंबित होती. ती रक्कम काढण्यासाठी भावना चौधरी यांनी तक्रारदाराकडे 10 टक्के लाचेची मागणी केली होती. पण तडजोडी अंती 5 हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले, ती रक्कम स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज तिला बेळ्या ठोकल्या आहे.

महिला अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडे 56 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती. एसीबी अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत कारवाई केली आणि महिला अधिकाऱ्याला अटक झाली. संबंधित महिला अधिकारी भावना चौधरी या कोल्हापूरच्या आरोग्य सेवा मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या. तक्रारदार व्यक्तीने त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील 6 लाख 72 हजार रुपये मंजूर करण्यासाठी विनंती केली होती. पण त्यासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांनी रकमेच्या 10 टक्के प्रमाणे लाच मागीतली होती. अखेर तडजोडीअंती 5 हजार रुपये देणे निश्चित झालं होतं. तक्रारदार व्यक्तीने महिला अधिकाऱ्यासोबत लाचेबाबत तडजोड करुन 5 हजार रुपये निश्चित केले. त्यानंतर एसीबीकडे तक्रार केली.

त्यांच्या तक्रारीची दखल घेत एसीबी अधिकारी कामाला लागले. त्यांनी सापळा रचला आणि महिला अधिकाऱ्याला रंगेहात लाच घेताना पकडण्याचं ठरवलं. एसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारीनुसार अगदी तसंच घडलं आणि त्यांनी रचलेला सापळा यशस्वी ठरला. एसीबी अधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला रक्षाबंधनाच्या दिवशी लाच घेताना रंगेहाथ पकडलं.

कार्यालयात अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना आरोग्य उपसंचालक मात्र लाच घेण्यात व्यस्त होत्या. या लाचखोर अधिकाऱ्याचा पर्दाफाश लाचलुचपत विभागाने करत रंगेहाथ ताब्यात घेतले. एका बाजूला अमृत महोत्सवी कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी हे काम मंजूर करण्यासाठी तक्रारदाराला कार्यालयात बोलवून घेतले होते. यावेळी 5 हजार रुपयांची लाच घेताना त्या लाचलुचपत विभागाच्या ताब्यात अलगद सापडल्या. ‘या’ अधिकाऱ्यांनी केली कारवाई सापळा पथक : आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, पो.हे.कॉ.शरद पोरे पो.कॉ संदीप पडवळ पो.कॉ.मयूर देसाई पो.कॉ.रुपेश माने म.पो.कॉ.छाया पाटोळे लाप्रवि, कोल्हापूर. मार्गदर्शन अधिकारी : राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

6 mins ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

24 mins ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

44 mins ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

58 mins ago

विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर आढळल्यास नागरिकांनी तत्काळ माहिती द्यावी, आयकर विभागाचे आवाहन.

निवडणुकीतील काळ्या पैशाबाबत नागरीक करू शकतील थेट आयकर विभागाकडे तक्रार; टोल-फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप किंवा ई…

1 hour ago

मिरज येथील वालनेस हॉस्पिटल (मिशन हॉस्पिटल) येथे होणाऱ्या आंदोलनाला सेवक कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरज:- येथील आरोग्य पंढरीला नाव लवकिक…

1 hour ago