विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहता:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अस्तगाव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची चार चाकी गाडी खरेदी करण्याचा व्यवहारात मुंबई येथील पवई परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या आरोपीवर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.विक्रांत दिलीप रोकडे रा. वडगाव लांडगे ता.संगमनेर जि. अहमदनगर असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार विश्वास त्रिभुवन रा. अस्तगाव ता. राहाता जि. अहमदनगर फिर्यादी अस्तगाव येथिल चर्च मधे नियमित प्रार्थनेसाठी जात असतो. अस्तगाव येथील चर्च मध्ये शंकर शेळके रा. गोंधवणी ता. राहाता हे देखील प्रार्थनेसाठी येत होते. त्या निमित्ताने त्यांची व माझी ओळख व परिचय झाला. त्यांचे व माझे परिचयातून त्यांचा मेव्हणा विक्रांत दिलीप रोकडे रा. वडगाव लांडगे ता.संगमनेर जि. अहमदनगर हा मुंबई येथे नोकरीस असुन तो गाड्यांचे खरेदी विक्रीचा धंदा करतो असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांना मला घरगुती वापरासाठी गाडी घेण्याचे सांगितले त्यावेळी त्यांनी मला त्यांचा मेव्हणा यांचा मोबाईल नंबर दिला व त्यानंतर विक्रमचे व माझे फोनवर बोलणे झाले. विक्रमने मला गाडी पाहण्यासाठी मुंबई (पवई) येथे बोलावले. त्यावेळी मी व शंकर शेळके विक्रम कडे गाडी पाहण्यासाठी पवई मुंबई येथे गेलो. तेव्हा विक्रम हा त्याचा मित्र गौरव कदम यांचे सोबत आम्हा MH46 V8040 ही पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर VDI गाडी दाखविण्यासाठी घेवुन आला. त्यावेळी गाडीचे कागदपत्रे त्यांनी दाखविली नाही व नंतर फोनवर पाठवितो म्हणुन सांगितले. गाडीची किंमत रुपये 2.50,000/- ठरली. त्यावेळी विक्रम म्हणाला की गाडीवर बँकेचा बोजा आहे, तो कमी करुन मी तुमचे नावावर गाडी करुन देईल पण त्यासाठी तुम्ही मला आज रुपये 50,000 द्या तेव्हा मी विक्रमला रोख रक्कम रु.35,000 दिले व बाकीचे नंतर देण्याचे बोलणे झाले व आम्ही परत गावी निघुन आलो.
त्यानंतर विक्रम मला फोन करून पैसे पाठविण्याची मागणी करत होता म्हणून मी त्याचे सांगण्यावरून त्याचा मित्र गौरव कदम याचे फोन नंबरवर फोन पे ने दि.22/11/2022 रोजी रक्कम रुपये 15,000 व दि. 03/12/2022 रोजी रक्कम रु.20,000 पाठविलेले आहेत. सदरची रक्कम विक्रांतला पाठविण्यापूर्वी मी त्यांचे आई वडीलांना समझ भेटलो व फोन वरून बाललो तेव्हा त्यांनी देखील मला पैसे पाठविण्यास सांगितले व मी पैसे पाठविले. त्यानंतर मी विक्रांतला वेळोवेळी गाडी देण्यासाठी व माझे नावे करून देण्यासाठी फोन परतु त्या गाडीची एन.सी आली नाही आल्यावर करून देतो असे सांगितले. मी विक्रमचा मेव्हणा शंकर शेळके व विक्रम आई वडील यांना देखील समक्ष भेटलो व फोन वरून बोललो माझे सदरचे व्यक्तिसोबत बोलणे माझे अस्तगाव येथील घरून व इतर ठिकाणावरून होत असे. परंतु त्यांनी मला उडवाउडवीचे उत्तरे दिली. मी सदरचे व्यक्तीकडे मी दिलेल्या पैशाची मागणी केली त्यावेळी व त्यानंतर त्यांनी मला उडवा उडवीचे उत्तरे देवुन माझी आर्थिक फसवुण केली आहे.
सदरची व्यक्ती ठरल्याप्रमाणे मला गाडी माझे नावे करुन देत नाही व पैसे देखील परत करीत नाही. वर नमुद लोकांनी संगनमत करुन माझे कडुन रक्कम उकळुन मला गाडीची विक्री न करता दुसऱ्यास विक्री केल्याची मला शंका आहे अशा प्रकारे माझी घोर फसवणुक केली आहे. सदरचे व्यक्तिबरोबर चे माझे बोलणे मोबाईल मधे रेकॉर्ड आहे. सिडी मध्ये घेतलेले असून या फिर्यादीसोबत सिडी देत आहे. म्हणुन सदरची माझी त्यांचे विरुध्द लेखी फिर्याद व तक्रार आहे. सबब विनंती की,वर नमुद व्यक्तींचे विरुध्द गुन्हा दाखल करुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी.
अशा प्रकाची तक्रार फिर्यादी विश्वास त्रिभुवन यांनी केली आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलेलं आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…