अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडूनच : तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई
✒️उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा, मेहकर येथे दि.१९ फेब्रुवारी:- अन्यायाच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढा देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. त्यांचे विचार आपण समाजात रुजविण्याची आवश्यकता आहे. समाजात वावरत असताना अन्याया विरुद्ध लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडूनच मिळाली असल्याचे प्रतिपादन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई यांनी केली.
यावेळी तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई म्हणाले की, अठरा पगड समाजातील बांधवांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केलं. त्यांच्या सैन्यदलात सर्व समाजातील शिलेदार होते.सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांनी राज्यकारभार केला. राज्यात कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याची त्यांनी कायम दक्षता घेतली. त्यांचा जन्मोत्सव आपण मोठ्या आनंदात केवळ देशात नव्हे तर जगभरात साजरा करत आहोत. हा जन्मोत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण रोज करून समाजात त्या स्वरूपाचं काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कुणाल माने, मुख्य कार्यकारणी अनिलभाऊ देबाजे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजकुमार ऊचित, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम खरात, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय सरकटे, मेहकर शहर अध्यक्ष विशाल बाजड, नितीन गवई आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…