75 वे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त चोपड्यात प्रभात फेरीचे आयोजन.

विश्वास वाडे, चोपडा प्रतिनिधी

चोपडा:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या मोहिमेची जनजागृती व्हावी म्हणून शहरांतील विवेकानंद विद्यालय , आशा टॉकीज रोड , गोल मंदीर, तहसिल कार्यालय, महात्मा गांधी चौक , मेन रोड , छत्रपती शिवाजी महाराज चौक , नगरपरिषद कार्यालय पर्यन्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सदर रॅलीत विद्यार्थ्यांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रॅलीचे पत्र तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने तालुक्यातील जवळपास सर्व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले होते पण मात्र काही मोजकेच अधिकारी सदर रॅली प्रसंगी उपस्थित होते.

सदर रॅली प्रसंगी चोपडा तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित, पोलीस उपविभागीय अधिकारी कृषिकेश रावले, मुख्याधिकारी हेमंत निकम, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले ,चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पीआय अवतारसिंग चव्हाण, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय अमर वसावे आदी अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या थीमवर जिल्हा परिषद शाळा अजंतीसिम या शाळेचे उपशिक्षक प्रवीण माळी यांनी आपल्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या स्वनिर्मित गीताचा व्हिडिओ तयार केला आहे आणि सदर व्हिडिओ पोलीस उपविभागीय अधिकारी कृषिकेश रावले यांच्या शुभहस्ते लॉन्च करण्यात आला सदर घोडगाव केंद्रातील शिक्षक, केंद्रप्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले व गटविकास अधिकारी बी एस कोसोदे यांनीदेखील सहभाग घेतला आहे. सदर व्हिडिओची निर्मिती अतिशय उत्कृष्ट झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.सदर रॅलीत विद्यार्थ्यानी भारत माता की जय, वंदे मातरम्, हर घर तिरंगा अशा प्रकारच्या जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.सदर रॅलीसाठी. तहसिलदार यांनी पुढील कार्यालयांना रॅलीत सहभागी होण्यासाठी सूचित केल्या होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी, चोपडा भाग चोपडा , प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यावल, सहा.अभियंता, पाटबंधारे उपविभाग ,उपअभियंता, सार्वजाकि बांधकाम विभाग ,उपविभागीय मृदा संधारण अधिकारी, सहा. निबंधक सहकारी संस्था ,गटविकास अधिकारी, पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चोपडा शहर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चोपडा ग्रामीण, मुख्याधिकारी, नगरपालिका चोपडा, व्यवस्थापक, म.रा.प. महामंडळ , गट शिक्षण अधिकारी प.स.चोपडा,तालुका आरोग्य अधिकारी प.स.चोपडा व चोपडयातील सर्व शैक्षणिक संस्थातील शिक्षकेतर कर्मचारी वर्ग शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

7 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

8 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

8 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

9 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

9 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

9 hours ago