विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयामध्ये नुकताच विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात पार पडला. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन विजयराव गोर्डे यांचे हस्ते उद्घाटन केले.
या कार्यक्रमामध्ये सुमारे 260 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गणेश वंदना, स्वागत गीत, भारुड, एकांकिका, नाटिका, संबळ, विनोदी बातम्या, रिमिक्स, कराओके सॉंग, लावणी अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल यात समाविष्ट होती. ड्रेपरी, सूर, ताल, लय, हावभाव, सादरीकरण या बाबींनी उपस्थित प्रेक्षकांची मने वेधून घेतली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष कदम तसेच छाया जेजुरकर, निर्मला लावरे, किरण आंबेकर, कृष्णकांत अंत्रे, वामन घोडसरे , कविता घोडसरे आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.
यावेळी परीक्षक म्हणून पर्यवेक्षक प्रमोद तोरणे, ज्ञानेश्वर केदार, प्रतिक्षा थोरात यांनी मोलाची भूमिका बजावली. पालकांनी देखील आपल्या पाल्यांचे कलागुण पाहण्यासाठी मैदानावर तुफान गर्दी केली होती. झुमक्यावाली पोर…, पाटलांचा बैलगाडा…, कुण्या गावाचं आलं पाखरू…, नाद एकच एकच…या गाण्यांच्या तालावर उपस्थितांनी देखील ठेका धरला होता. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे कौतुक म्हणून सरपंच सविता चोळके, अनिल नळे, आर. बी चोळके,माजी सरपंच नवनाथ नळे, संतोष गोर्डे, श्रीनिवास त्रिभुवन, मनीषा मोरे व इतर अनेक ग्रामस्थांनी आर्थिक स्वरूपाची बक्षिसे दिली.
या प्रसंगी जालिंदर गायकवाड, ज्ञानेश्वर राजळे, संतोष सोनवणे, सचिन चौधरी, सखाराम शिंदे, रोहिदास पोटकुले, वृषाली बेल्हेकर, अर्चना हासे, लेखनिक सुनील बोठे, ग्रंथपाल रंजय कडू, अनिल घोडेकर, राजाराम थोरात, सुमन कणसे, संजय चोळके,पिंटू त्रिभुवन, वाल्मिक बिडवे, रंजय सुलाखे, शेजुळताई,हेमंत गोर्डे, पंकज गोर्डे, सतीश त्रिभुवन, नितीन त्रिभुवन, सुयोग नळे आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संतोष कदम व छाया जेजुरकर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत शिंदे यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व प्रेक्षकांचे ऋण व्यक्त करून आभार मानले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…