देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका प्रतिनिधी (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- तालुक्यातील रायपूर येथे देश गौरव सुभाषचंद्र बोस वाचनालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव कोहाड यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सिराज शेटे, ॲड जीवन कन्हेर, मनसुरभाई महाजन, शफी शेटे, चंद्रकांत पराते, इब्राहिम तुरक, ग्रामपंचायत सदस्य सुनिता नागपुरे, गायत्री लारोकर, निकेश धार्मिक, इंदू आलम, दिपमाला बिल्लोरे, जावेद महाजन, माजी सरपंच इनायतुल्ला शेटे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय अड्याळकर, सुहास कोहाड, शरद वजरे समिर मेंडजोगे, नंदु इटनकर, हमीद शेटे, उपस्थित होते.
देशगौरव सुभाषचंद्र बोस वाचनालय हिंगणा येथे शिवाजी महाराजाचे जीवन चरित्र, पराक्रम व कार्य यावर आधारित चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आली होती. सदर चित्र प्रदर्शन एक आठवडाभर ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव कोहाड यांनी दिली. शिवाजी महाराज युवकांसाठी एक आदर्श असून त्यांच्या विचारांची ज्योत जनसामान्यांमध्ये प्रज्वलित करावी व त्यांच्या विचारांचा वारसा चालवावा असे मनोगत जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी यावेळी व्यक्त केले.
या शिव जयंती निमित्त दत्तात्रय अड्याळकर,शरद वजरे,उप सरपंच सिराज शेटे, ग्रामपंचायत सदस्या गायत्री लारोकर , सदस्य जावेद महाजन,समिर मेंडजोगे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भास्करराव धार्मिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रंथपाल सेवकराम लिखार यांनी मानले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…