अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसह मक्तेदार (भाडेतत्वावर) शेतकऱ्यांनाही आर्थिक अनुदान द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी.

प्रवीण जगताप हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
हिंगणघाट:-
राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदतीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचा (एनडीआरएफ) निकषांच्या दुप्पट मदद देण्याची राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.परंतु ज्यांनी मक्तानी शेती केली त्याच काय ? जिल्ह्यात जवळपास २० ते ३० टक्के शेतकरी हे मक्तेदारीने ( भाडयानी ) शेती करतात. ते शेतकरी सुद्धा अतिवृष्टीग्रस्त असून त्यांना देखील नुकसान भरपाईची आर्थिक मदद मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. विशेषतः विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आले असता वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अतिवृष्टी भागाला भेट दिली तेथील शेतकऱ्यांचा व्यथा समजून घेतल्या व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदद देण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारांनंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला. परंतु ही आर्थिक मदद ७/१२ ज्याचा नावावर आहे त्याना मिळत असून मक्तेदार (भाडेतत्त्वावर) शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदद देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

10 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

10 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

11 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

11 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

11 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

12 hours ago