देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी (नागपूर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- निश्चय करून सातत्याने प्रयत्न केल्यास उद्दिष्ट पूर्ण होतात व यश प्राप्त होतो त्यासाठी निश्चयाकडे होणारी वाटचाल ही प्रामाणिकतेने व आपल्या परिश्रमावर विश्वास ठेवून करणे गरजेचे असते असे केल्यास यश हमखास प्राप्त होतो असे प्रतिपादन संत गमाजी महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित अनुदानित आदिवासी आश्रम शाळा व गोपीकिशन बंग विद्यालय येथील दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त निरोप समारंभाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मराठी भाषा अभ्यासगटाच्या सदस्या डॉ. मंजुषा सावरकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रेमलाल चौधरी, संस्थेचे संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग, सरपंच मधुकर तेलंग,नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, गोपीकिशन बंग विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गुडधे उपस्थित होते. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन कल्पना गोरे, प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश चौधरी यांनी तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अनुदानित आदिवासी आश्रम शाळा व गोपीकिशन बंग विद्यालय येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…