देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी (नागपूर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वानाडोंगरी:- नगरपरिषद अंतर्गत होत असलेल्या वायसीसीई कॉलेजच्या गेट पासून ते शालिनीताई मेघे दवाखाना समोरील सौंदरीकरण बांधकाम बाबत, आज दिनांक 22 फेब्रुवारीला दीपक नासरे हिंगणा तालुका अध्यक्ष मनसे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी भारत नंदनवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित शहर अध्यक्ष निलेश भुरसे, विधानसभा उपसंघटक नंदु पोटे, शहर उपाध्यक्ष योगेश टोंगे, तालुका उपाध्यक्ष बाबा महाजन, शाखा अध्यक्ष प्रफुल अवचट, प्रशांत दिवे उपस्थित होते.
वानाडोंगरी नगरपरिषद अंतर्गत होत असलेल्या सौंदरीकरण हे लोकांची मागणी नसतांनी होत आहे. आपण त्या जागेवर दुकानदारी चालवत असलेल्या लोकांना रस्त्यावर आणले, आणि त्यांना नोटीस दिले कि रस्त्यावर अपघात वाढले त्यामुळे जागा खाली करा. जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आणि सौंदरीकरण हे नगरपरिषद चे व वानाडोंगरी शहरातील लोकांच्या टॅक्स मधले पैसे हे खरोखर शहरासाठी कि आमदार साहेबांच्या दवाखान्याच्या सौंदरीकरणासाठी आमदार साहेबांना खुश करण्याकरिता ही चाटू गिरी आहे का? तेथील जागेवर पोटाची खडगी भरण्याकरिता लोक व्यवसाय कराचे पण अपघाताचे कारण सांगून आपण तिथे त्याच जागेवर सौंदरीकरण च्या नावावर जागा गुंतवून ठेवली आहे. सौंदरीकरण करण्याकरिता वानाडोंगरी शहरामध्ये भरपूर जागा आहे पण तीच जागा का? आणि त्या सौंदरीकरण चा ठेका पण नगरसेवकच्या लोकांनाच कसा? मिळतो याच काय गूढ आहे हे याची चौकशी करावी. अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…