मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- डॉ. श्रीकांत शिंदे फॉउंडेशन द्वारा संचालित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मार्फत वंदनीय बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर नालवाडी येथे नुकतेच संपन्न झाले.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे यांचे पुढाकाराने व भाग्यलक्ष्मी स्वयंम सहाय्यता महिला गट, ग्रामसंघ नालवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात पहिल्या शिबिराचे आयोजन बँक ऑफ इंडिया कॉलोनी, नालवाडी येथे करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आयोजित शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.बचत गटाच्या संचालिका वंदना किशोर बोकडे यांच्या सहकार्याने औषधे उपलब्ध करण्यात आली तर शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ.अभय मोहीते, डॉ. शुभम तळवेकर यांनी मोफत रुग्ण तपासणी करून औषधे वितरित केली. यावेळेस बचत गटाचे संचालिका नेहा वरघणे, शुभांगी भोयर, मधू वाघाडे, आशा तुराळे, कुमुद मडावी, वंदना बोकडे यांनी सहकार्य केले.शिबिरात ४७ रुग्णांनी तपासणी करून औषधांचा लाभ घेतला.
जिल्ह्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ची स्थापना करणार
ठाण्याचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी डॉ.श्रीकांत शिंदे फॉउंडेशन ची स्थापना केली. या फॉउंडेशन द्वारा संचालित शिवसेना वैद्यकीय मदत केंद्राच्या माध्यमातून राज्यात आरोग्य शिबीरे राबवून गोरगरीब व गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जाते तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मार्फत आर्थिक सहकार्य केले जाते. योजनेचा लाभ गोरगरीब व गरजू रुग्णापर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा सहसंपर्क राजेश सराफ व जिल्हाप्रमुख गणेश इखार यांचे मार्गदर्शनात तसेच शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्यातून जिल्ह्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” शिबीरे राबविणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे यांनी यावेळेस सांगितले.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…