प्रशांत जगताप मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बदलापूर:- धम्मसिरी फाऊंडेशन, भारत यांच्या वतीने कुळगाव – बदलापूर नगरपरिषद सभागृह, कात्रप, बदलापूर (पूर्व ) जि.ठाणे येथे २५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या संमेलनाचे उद्धघाटक म्हणून डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांची उपस्थिती राहणार आहे, या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांची उपस्थिती लाभणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी बी. अनिल तथा अनिल भालेराव असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रविंद्र जाधव, राजाराम खरात उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनात दि. २५.२.२०२३ रोजीच्या पहिल्या सत्रात सकाळी ९ ते १० वाजता संविधान रॅली काढण्यात येणार असून स्मरणिका प्रकाशन व अनिल भालेराव यांच्या कडिकाळ ‘कांदबरीचे तसेच किशोर कासारे यांच्या ‘ पोसोन ‘काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असून प्रास्ताविक शामराव सोमकुवर, सूत्रसंचालन सुभाष खैरनार, आभारप्रदर्शन संजय माने करणार आहेत. दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत भारतीय संविधान : एक चिकित्सक अभ्यास ह्या विषयावर परिसंवाद तसेच दुसऱ्या सत्रात ३ ते ४.३० आंबेडकरवादी स्व-कथने व सायंकाळी ४.३० ते ५.०० वा. अनिल भालेराव यांच्या घुसमट कथा संग्रहातील कथा विषयावर कथाकथन आयोजित केले असून सायंकाळी ५.०० ते ७.०० वा. राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनात दि. २६.२.२०२३ रोजी पहिल्या सत्रात सकाळी ते १०.३० वा. नाटक’ मी सोनबा बोलतोय सकाळी १०.३० ते १२.३० वा. आंबेडकरी साहित्य अनुवाद : महत्त्व आणि साहित्य निर्मितीत योगदान, दुपारी १२.३० ते १.३० वा. लेणी संवर्धन व शिलालेख यांचे आजच्या स्थितीतल महत्त्व ह्या विषयावर परिसंवाद, दुपारी १.३० ते २.०० वा.कार्यकारणी पदाधिकारी यांचा कौतुक सोहळा, जीवन गौरव पुरस्कार, साहित्य मित्र पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४.३० ते ६.३० वा. विवेक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिताचे कवी संमेलन होणार असून कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तम भगत, तर आभार प्रदर्शन सुभाष आढाव करणार आहेत. सायंकाळी ६.३० ते ७.०० वा. ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या उपस्थितीत आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या समारोपाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदरहू आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अनिल भालेराव, डॉ. संदीप भेले, शामराव सोमकुवर, सुनिल दुपटे, रविंद्र सावंत, डॉ. नंदकुमार कांबळे, रमेश कांबळे, स्मिता गायकवाड परिश्रम घेत आहेत.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…