आजादी का अमृत महोत्सवानिमित्त प्रताप विद्या मंदिराची भव्य जनजागृती रॅली.

विश्वास वाडे, चोपडा प्रतिनिधी

चोपडा :- एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात दि.४ ऑगस्ट २०२२पासून ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत क्रांती सप्ताहांतर्गत विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, महिला मेळावा, कृषीपर मार्गदर्शन, राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा ,देशभक्तीपर स्लोगन स्पर्धा, वेशभूषा ,आज एक क्रांतिकारक..इ. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम- राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे कार्य केले गेले.

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आलीत.दि११ ऑगस्ट २०२२ गुरुवार रोजी सकाळी ८ वाजता स्वराज्य महोत्सवाची सुरुवात करण्याआधी विद्यार्थ्यांची भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. एन सी सी चे कॅडेट, गावातील विभाग, सकाळ विभाग, उर्दू विभाग तसेच दुपारी विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता… क्रीडा विभागाच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अरुण नगर- श्रीराम नगर- थाळनेर दरवाजा- ग्रामीण पोलीस स्टेशन हा मार्ग निवडत प्रभात फेरी काढण्यात आली.विद्यार्थ्यांचा उत्साह व सूर बद्ध घोषणांनी घराघरातील जनतेच्या मनामध्ये घरोघरी तिरंगा ही मोहीम अतिशय प्रभावीपणे बिंबवण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रध्वजधारी एनसीसीचे कॅडेट्स ,विद्यामंदिरातील चिमुकल्यांच्या जयघोष करणाऱ्या घोषणा याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले… या भव्य रॅलीची सांगता विद्या मंदिराच्या प्रांगणावर करण्यात आली.यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री पी एस गुजराथी यांनी ….म्हणून आम्ही भारतीय आहोत व गर्व आहे आम्हाला भारतीय असण्याचा ….अशा शब्दात चिमुकल्यांचे कौतुक केले.हर घर तिरंगा, हर एक के मन में तिरंगा ,भारत की आन बान और शान तिरंगा असा संदेश देत समापन करण्यात आले.. यावेळी विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक श्री एस जी डोंगरे ,ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री जे एस शेलार, पर्यवेक्षिका श्रीमती एम डब्ल्यू पाटील , पर्यवेक्षक श्री एस एस पाटील ,श्री पी डी पाटिल, एन सी सी विभाग शिक्षक श्री रोहन पाटील श्रीमती जे आर बडगुजर मॅडम क्रीडाशिक्षक एन एन महाजन सर्व शिक्षक बंधू भगिनी लेखनिक कर्मचारी आदींनी उपस्थिती देत भव्य रॅली आयोजनात मोलाचे सहकार्य दिले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

12 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

13 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

13 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

13 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

14 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

14 hours ago