पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ ७०२०७९४६२६
शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- प्रतिष्ठीत महिलांच्या फोनवर संपर्क साधून पैसे मिळविण्यासाठी गैरकृत्य करण्याचे आमीष दाखवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या अज्ञात आरोपीविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गु.नोक १९८/२२ भादवि कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये यातील अज्ञात आरोपी हा अनेक व्यक्तींना कॉल करून त्यांना विविध प्रलोभने दाखवून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत असल्याचे आढळले. त्यावरून यातील अज्ञात आरोपीचे बैंक डिटेल्स प्राप्त केले असता बँकेचा पत्ता जनकपुरी, दिल्ली व मोबाईल फोनचे टॉवर लोकेशन देखील त्याच परीसरात येत असल्याचे आढळले..म्हणून वरीष्ठांच्या परवानगीने पोउनि मनीषा जाधव, पो.हा रूपेश वाघमारे व पो. शि. आदेश चलवादी यांनी तपासकामी दिल्ली येथे पाठविले. सदर पथकाने जनकपुरी पश्चिम व पूर्व, विकासनगर, पालम विहार कॉलनी, गाझीयाबाद (उत्तरप्रदेश), हरीनगर या परीसरात सतत १३ दिवस अथक परीश्रम करून २५० सीसीटीव्हींचे फुटेज चेक करून आरोपीचे टॉवर लोकेशन, आरोपीचा वावर असलेली ठिकाणे, आरोपी वापरत असलेली बँक अकाउंट इत्यादी बाबत माहिती संकलीत केली व आरोपी वापरत असलेल्या दुचाकीचा मेक व नंबर निषन्न करून आर.टी.ओ. कडून दुचाकी मालकाची माहीती प्राप्त केली. त्यानंतर स्थानीक बातमीदार तयार करून त्यांना विशवासात घेउन यातील आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला व सापळा रचून आरोपी नामे १) चेतन मासी दासी, वय ३२, रा. विरेद्रनगर, दिल्ली व २) कविता अनिल शर्मा, वय २२, रा. उत्तमनगर, दिल्ली यांना ताब्यात घेउन अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्यानी गुन्हा कबूल केला असून गुन्हयात वापरलेल्या मोबाईल फोनसह एकुण आठ मोबाईल फोन व सिमकार्ड जप्त करण्यात आले..
सदरची कामगिरी मा राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदीपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ यांच्या आदेशान्वये मा. गजानन टोन्पे, सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, श्री. अरविंद माने, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे श्री. विक्रम गौड, पोलीस निरीक्षक गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि वाघमारे, पोशि आदेश चलवादी यांनी केली आहे. मनीषा जाधव, पोहा रूपेश वाघमारे ,पो. शि. आदेश चलवादी यांनी केली आहे. ..
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…