कोठारीच्या ठाणेदारांनी मुंबईतून बजावले कर्तव्य, आर्वीच्या रुग्णांच्या मदतीसाठी धावले प्रशासन.

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- तालुक्यात अनेक गावांना पुराणे वेढा घातला आहे तर काही गावात आरोग्य सुविधा नाही. अशा स्थितीत आर्वीतील यशस्वी रामचंद्र गेडाम, पूर्वा मत्ते, सानवी जेऊरकर, रियासी जेऊरकर यांची तब्बेत बिघडली. आर्वी हे गाव लाठी उप पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने तिथल्या ठाणेदारांशी कुटुंबियांने संपर्क साधला परंतु लाठी गावसुद्धा पुराच्या वेढ्यात अडकले असल्यामुळे लाठीचे ठाणेदार मनोहर मोगरे यांनी कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण यांना माहिती दिली. ठाणेदार चव्हाण यांनी आज पहाटे ५ वाजता सदर माहिती फोन द्वारे गोंडपिपरीचे तहसीलदार के डी मेश्राम यांना देत रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. लागलीच तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चकोले यांचेशी संपर्क साधून कन्हाळगाव येथे जंगलात कॅम्प नंबर चार वर रुग्णवाहिका पाठवली. पोलीस कर्मचारी विनोद निखाडे, सचिन पोहनकर, प्रवीण कडुकर, साईनाथ उपरे, रानु पोरोते, डोंगरकर यांनी चारही जणांना उपचारासाठी चंद्रपूर ला रवाना केले.

विशेष म्हणजे कोठारीचे ठाणेदार चव्हाण यांची आई मुंबई ला दवाखान्यात व्हेंटिलेटर वर असून ते स्वतः मुंबई ला आहेत. तरीसुद्धा तिथून सगळी परिस्थिती हाताळत रुग्णांना उपचारासाठी चंद्रपूर पाठविण्याची व्यवस्था केली. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याचे धन्यवाद केले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

15 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

15 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

16 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

16 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

17 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

17 hours ago