काँग्रेसच्या धोपटाळा ते पांढरपौणी आझादी गौरव पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार सुभाष धोटेंनी केली पदयात्रेतून जनजागृती.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

राजुरा:- राज्यासह देशभर सर्वत्र 75 अमृत महोत्सवानिमित्त निम्मित अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. राजुरा तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त राजुरा तालुक्यातील धोपटाळा, रामपूर, माथरा, गोवरी, चिंचोली (खुर्द) कळमना, चंदनवाही ते पांढरपौणी पर्यंत आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेतून काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारकांचे बलिदान, या ७५ वर्षात देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान इत्यादी अनेक विषयांवर जनजागृती केली. या पदयात्रेचे वरील सर्व गावांमध्ये स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आणि उत्तम प्रतिसाद देत सहभाग घेतला.

या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, कार्याध्यक्ष एजाज अहमद, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरणुले, राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईरशाद शेख, माजी सरपंच राजु पिंपळशेंडे, राजाराम येल्ला, मंजुषा खंडाळे, वसंता ताजने, उषाताई उरकुडे, लहू चहारे, संदीप घोटेकर, शंकर घोटेकर, दिवाकर मोरे, महादेव ताजने, मारोती बोढेकर, आनंदराव धोटे,. अनंता एकडे, नागेश मेदर, सि. आर. सिंग, शिवराम लांडे, प्रभाकर येरणे, प्रभाकर बघेल, संतोष शेन्डे, ब्रिजेस जंगितवार, जगदीश बुटले, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रणय लांडे, संदीप आदे, उमेश गोरे , कोमल पुसाटे, विनोद कावडे, मधु सोयाम, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, पर्यावरण अध्यक्ष योगिता भोयर, पुनम गिरसावडे, श्रीधर रावला, हारून शेख, यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत राजुरा येथील इन्फंटच्या विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल सीबीएससी च्या विद्यार्थिनिंची विभाग स्तरिय शालेय स्पर्धेकरिता निवड. संतोष मेश्राम…

36 mins ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेली गटबाजी उमेदवाराचा करणार गेम?

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना…

45 mins ago

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

22 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

23 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

23 hours ago