शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या – रमेशचंद्र बंग

हिंगणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका, जिल्हा नागपूर.

नागपूर:- सततच्या पावसामुळे संपूर्ण हिंगणा तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशा आशयाचे निवेदन माजी मंत्री रमेशचंद्र बंग व माजी आमदार विजय घोडमारे (पाटील ) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने हिंगण्याच्या तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.

निवेदनात हिंगणा तालुक्यात सरासरीपेक्षा 430 मी मी अधिकचा पाऊस झाल्यामुळे शेत पिकाचे प्रचंड नुकसान झाले त्यात कापूस तुरी सोयाबीन संत्रा फळबागा भाजीपाला आदी शेतमालांना मोठ्या प्रमाणात झळ बसली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात कोणत्याही प्रकारचे पीक येण्याचे चिन्ह दिसून येत नाही अशा परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून त्याला आर्थिक संकटांना सामोर जावे लागत आहे. तेव्हा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये प्रति हेक्टरी व बागायतदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपये प्रति हेक्टरी सरसकट मदत जाहीर करून सनासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांमधील शेकडो घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानग्रस्त नागरिकांना सुद्धा शासनाने तातडीने मदत करावी  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंगणा तालुका तर्फे करण्यात आली.

यावेळी नागपूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, जि.प सदस्य रश्मी कोटगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगणा तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, प. स. उपसभापती सुषमा कावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष श्यामबाबू गोमासे, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गोतमारे, प.स सदस्य आकाश रंगारी, सुनील बोंदाडे, राजेंद्र उईके, उमेश राजपूत, अनुसया सोनवणे, पोर्णिमा दीक्षित, वैशाली काचोरे, गटनेता गुणवंता चामाटे, नगरसेवक नारायण डाखळे, प्रशांत सोमकुवर, दादाराव इटणकर, प्रवीण घोडे, राकापा महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर, राकापा जिल्हा उपाध्यक्ष लीलाधर दाभे, राकापा जिल्हा संघटक सुशील दीक्षित, मंगेश भांगे, प्रदीप कोटगुले,नाना शिंगारे, नरेश नरड, रामदास पुंड, राहुल पांडे, दीपक वर्मा, शेषराव उईके,दीपक कुडुमते, ऋषीदेव इंगळे, बाबा वानखेडे, शैलेश नागपुरे, नंदकिशोर कांबळे, सुरेश ठावरे, गणेश झाडे, प्रेमलाल भलावी, दीपावली कोहाड, सुनिता नागपुरे, सिराज शेटे , प्रमोद फुलकर, शैलेश राय, सूर्यकांत दलाल, अश्विन प्रधान आदींसह हिंगणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

11 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

12 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

12 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

12 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

13 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

13 hours ago