”आई तूच माझी माऊली” या नाटकाचे राकॉपा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- थाटेश्वर देवस्थान रिठी सावंगी (आजनसरा) येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने ”आई तूच माझी माऊली” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या प्रयोगाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रलय तेलंग, प्रमुख पाहुणे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवें यांची उपस्थिती होती.

झाडीपट्टीतील कलावंत लोक इतके उत्कृष्ट नाटक करतात मी अनेकदा चंद्रपूर, गडचिरोली या भागात प्रमुख पाहुणे म्हणून नाटक बघण्यासाठी गेलो असता आपण जे टीव्ही मध्ये बघतो सिने अभिनेते जे अभिनय करतात कृत्रिम/ मानवनिर्मित राहते, डेकोर केलेले राहते. पण हाडामांसाचे कलाकार हे झाडीपट्टीतील नाटक कलाकार राहतात. फक्त त्यांना मोठा स्टेज मिळाला नाही. त्यांना मोठा स्टेज उपलब्ध करून देणारे थाटेश्वर देवस्थानचे सचिव भास्करजी कोसुरकर यांचे मी अभिनंदन करतो असे मनोगत रा.कॉ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी मंचावर आजनसरा सरपंच श्रावणजी काचुळे, टाकळी सरपंच आशिष राऊत, फुकटा सरपंच सौ.नंदाताई योगेश्वर उमाटे, माजी सरपंच पंढरी देवतळे, रुद्रेश्वरजी सिंगल यांची उपस्थिती होती. आई तूच माझी माऊली या नाटकाचे आयोजन थाटेश्वर देवस्थानचे सचिव भास्करजी कोसूरकर, राजू चौधरी, मदन बोरेकर यांनी केले. या नाटकाला फुकटा गावातील लोकांचे सहकार्य लाभले.नाटक बघण्यासाठी आजनसरा परिसरातील जवळपासच्या अनेक ग्रामीण भागातील लोकांची उपस्थिती होती.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

6 hours ago