अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त समर्पण फाउंडेशन सावनेर व वित्तेश्वर निधि बँक लि.सावनेर च्या वतिने कलासृष्टी -2023 स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या द्वितीय वर्षांमध्ये तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी व युवक मिळून 95 जनांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत अनेकांनी आपल्यातील सुप्त कला गुणांचे प्रदर्शन करून स्पर्धा जिंकली.
युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त समर्पण फाउंडेशन सावनेर व वित्तेश्वर निधी बँक लिमी. सावनेर द्वारा आयोजित चित्राची थीम आपली संस्कृती,जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनगौरव, माझी शाळा, माझा आवडता खेळ, आमचे आजी आजोबा असे असावे माझे गाव व माझ्या कल्पनेतील कोल्हार नदी इत्यादी विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आशिष चांडक आय.एम.ए अध्यक्ष होते.त्यांनी आपल्या भाषणात सामाजिक स्वातंत्र्य, उच्च चरित्र्य व स्त्रियांच्या सन्मानाचे रंग भरले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व परीक्षक डॉ. स्नेहल लिमये प्राध्यापक ललित कला नागपूर विद्यापीठ यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्ती चित्रकलेतून व्यक्त होऊ शकते.चित्रकले कडे केवळ कमाईच्या उद्देशाने न पाहता ते स्वतंत्रपणे पहावे असे पालकांना सुचवून चित्रकलेबाबत मार्गदर्शन केले.प्रमुख उपस्थिती भाऊ गोतमारे सामाजिक कार्यकर्ते यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खरा मित्र असला पाहिजे असे सांगितले.
यावेळी प्रथम पुरस्कार राधा नरेंद्र बघेकर द्वितीय पारितोषिक कुमारी अवरव्ह अटाळकर तर तृतीय पारितोषिक तन्मय बोंडे यांना मिळाला. त्याच प्रमाणे 15 ते 25 वयोगटातील बालगटात कुमार राहुल गुप्ता यांनी प्रथम,आदित्य वाघमारे यांनी दुतीय व तृतीय पारितोषिक कुमारी सुखदा देशपांडे यांना मिळाले. 25 वर्षावरील खुल्या गटात प्रथम पारितोषिक रवींद्र मेश्राम, द्वितीय पारितोषिक कुमारी मेघा बागडे व तृतीय पारितोषिक सौ स्मिता उमरकर यांना मिळाले.
समर्पण फाउंडेशन सावनेर चे अध्यक्ष अँड अभिषेक मुलमुले यांनी युवकांच्या मानसी को व्यक्तीमत्व विकासासाठी फाउंडेशन ने केलेले प्रयत्न विद्यार्थी गौरव आणि कोल्हार पुनर्जीवन अभियान यांचे वर्णन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समर्पण फाउंडेशन सावनेरचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पोटोडे, सचिव कुलभूषण नवोधिंगे, विनोद बागडे,मंदार मंगळे,प्रवीण नारेकर आणि डॉ.विलास मानकर, डॉ.राहुल दाते तसेच सर्व शाळेच्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन अभिषेकसिंह गहरवार यांनी तर आभार प्रदर्शन तुषार उमाटे यांनी मानले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…