पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-वर्चस्व सिद्ध करण्यासपोलिस उपनिरिक्षक पाटोळे व स्टाफ असे आरोपींचा Unit हद्दीत शोध घेत असताना, Unit-2 कडील HC/उज्वल मोकाशी व नामदेव रेणुसे याना त्यांचे बातमीदारामार्फत दाखल गुन्ह्यात अमर तानाजी जाधव याचा सहभाग असून तो घटना घडतेवेळी तेथे हजर होता. व तो आज सायंकाळी त्याचे पत्नीस भेटण्याकरिता गिरीधर भवन चौक येथे येणार असून त्याने अंगात निळ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व फिक्कट निळी जीन्स पँट घातली आहे, अशी वर्णनासह खात्रीलायक बातमी मिळाली. सदरबाबत Unit -2 प्रभारी मा. क्रांतिकुमार पाटील सो. याना कळविले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वरील स्टाफ ने तात्काळ बातमी ठिकाणी धाव घेत सापळा रचून प्राप्त वर्णनावरून एका इसमास 18.40 वा. सुमारास ताब्यात घेतले. त्यास स्टाफची ओळख सांगून त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अमर तानाजी जाधव वय 32 रा 425/263 मीनाताई वसाहत, गुलटेकडी पुणे असे असल्याचे समक्ष सांगितले. त्यांचेकडे दाखल गुन्ह्याअनुषंगाने चौकशी करता, तो असबंद माहिती देऊ लागला. त्यानंतर त्यास Unit-2 कार्यालयात आणून आणखी कसून तपास करता, त्याने सदरचा गुन्हा परिसरात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यानंतर स्वारगेट पो स्टे कडे अमर जाधव बाबत चौकशी करता तो दाखल गुन्ह्यात पाहिजे असून सध्या तडीपार असल्याचे समजले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाहीकामी स्वारगेट पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीच्या गुन्ह्याचा पूर्व इतिहास* :- आरोपी अमर तानाजी जाधव हा स्वारगेट पो स्टे कडील शरिराविरुद्ध गुन्हे करणारा सक्रिय गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी, खुनाचा प्रयत्न, गंभीर- साधी दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. त्यास मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 यांनी पुणे शहर, पि. चिं आयुक्तालय, व जिल्ह्यातून 6 महिण्याकरिता तडीपार केले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, PSI राजेंद्र पाटोळे, पो.अ. उज्वल मोकाशी, नामदेव रेणुसे, संजय जाधव, मोहसीन शेख, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, कादिर शेख व नागनाथ राख या पथकाने केलेली आहे
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…