✒️संदिप सुरडकर, नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय युवकाने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केलं. ही घटना समोर येताच संपूर्ण नागपुर शहरात एकच खळबळ उडाली आहे. अमन विजय ठाकरे वय 21 वर्ष राह. वाडी असे आरोपीस आरोपी तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नागपुर शहरातील वाडी परीसरात राहणाऱ्या अमन विजय ठाकरे हा मजुरीचे काम करतो तर अल्पवयीन 15 वर्षांची विद्यार्थिनी दहावीला शिक्षण घेत आहे. तिची आई मोलमजुरीचे काम करून उद्धरनिर्वाह करते. आरोपी आणि पिढीत मुलगी एकाच कॉलनीत राहत असल्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीची आरोपीसोबत ओळख झाली. त्यांचे एकमेकांसोबत बोलणे सुरू झाले. आरोपीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला विश्वासात घेतले. मी तुझ्या सोबतच लग्न करीन, असे आमिष दाखविले.
आरोपी अमन विजय ठाकरे याने नोव्हेंबर 2022 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान तिला आपल्या राहत्या घरी नेऊन तिच्या सोबत अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिच्या आईने तिला रुग्णालयात नेले असता तेथे ती गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती तिच्या आईला कळली. याप्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सूचनेवरून आणि अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वाडी ठाण्याचे उपनिरीक्षक विजेंद्र नाचन यांनी आरोपी अमन विरुद्ध कलम 376, 376 (2), (एन) (जे), सहकलम 4, 8, 12 पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास वाडी पोलिस करीत आहेत.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…