रय्यतवारी येथे ४०० कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश.
प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भाजप सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करणारा पक्ष आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कधीही पातळी सोडली नाही. भाजपाने समाजकारणाची नेहमीच कास धरत कायम सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडविण्या साठी आणि आनंद पेरण्याचे काम केलं आहे . त्यामुळेच भाजप सर्वांच्या पसंतीचा पक्ष असल्याचे ठाम प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद कडु, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, महानगर महामंत्री बिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सुरज पेदुलवार, भाजप नेता मनोज सिंघवी, माजी नगरसेवक अजय सरकार, भाजयुमोचे महासचिव सुनिल डोंगरे, प्रज्वल कडु, प्रमोद क्षीरसागर, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमालकर, पक्ष प्रवेश करणारे प्रविण गुरमवार, बी.बी. सिंग, राजेंद्र तिवारी, शहाजी आदी उपस्थित होते.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रय्यतवारी येथे भाजपामध्ये ४०० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते, पक्षावर विश्वास ठेऊन प्रवेश करणाऱ्यांची कधीही निराशा होणार नाही. पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चपळतेला चित्त्याची उपमा देत ना. मुनगंटीवार यांनी वेगाने पक्षहितासाठी काम करण्याचे आवाहन केले. चंद्रपूर जिल्हा छोटा भारत आहे, कारण येथे देशातील बहुतांश भाषा बोलणारे लोक राहतात. रय्यतवारीसह चंद्रपुरात हा सलोखा वाढत जावा असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले. देशाचा विकास साधायचा असेल तर भाजप आणि विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असेही ना. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
ज्या ज्या व्यक्तीने भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे, त्या त्या व्यक्तीने सामाजिक विकास होताना बघीतला आहे. भाजप म्हणजे प्रगती, विकास, उन्नती आणि सकारात्मक शक्ती असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार यांनी प्रवीण गुरमवार यांच्या नावाची भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. यावेळी ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरमवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
डब्ल्यूसीएलच्या जमिनीचा तिढा सोडविणार: वेकोलिने अनेक नागरिकांना जमिन रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील ना. मुनगंटीवार यांनी दिली.
समाजाला जातीयवादातून मुक्त करा: समाजात जातीय विष पसरविण्याचे काम केले जात आहे. संतांनाही जातीमध्ये विभागण्याचे काम करण्यात येत आहे. देशाचे तुकडे करणाऱ्यांनी हा प्रकार चालविला आहे. त्यामुळे जातीयवादापासून समाजाला मुक्त करण्याची वेळ आली आहे. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून हे साध्य होईल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर शिलाताई चव्हाण, चंद्रकला सोयाम, माया उईके, संदीप आगलावे, मोनिषा, अजय सरकार, धमाप्रकाश भस्मे, रूद्रनारायण तिवारी, सागर येरणे, मनोज पोतराजे, आकाश मस्के, आकाश ठुसे, बी.बी. सिंह, राजेंद्र तिवारी, भानेश मातंगी, सुरज सिंह, राजेश यादव, गिरीश गुप्ता, बलराम शहा, उधय अडदूर, बिर मामा सुरेंद्र प्रसाद, कृष्ण कुंडू, सुरेंद्र चौरसिया, डॉ.शंकर टोकळ या कार्यक्रमात भाजपा पक्षात प्रविण आनंद गुरमवार, श्याम यादव, सिनू कदम, ओमेश आयलू, राजेश अर्किला, राजेश यादव, बबलू कोरी, किरण कंगुलवार, अविनाश एरुगुराला, राजकुमार निषाद, महेंद्र गोंडा, त्रिपात काम्पेली, सागर अकनुरी, कमलेश आवाडे, विजय कंपेल्ली, रुपेश बोनकोर, सुनील यादव, शुभम श्रीराम, प्रगा श्रीराम, रोहन अनुरी, सोमनाथ निषाद, विश्वजीत यादव, कृष्णा शेट्टी, शुभम तोकल, रवी कळवा, रविशेखर, राकेश चौर्शी, सुरेंद्र चौर्शी, महेंद्र पुलपाका, रवी गुजर यांनी प्रवेश केला.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…