नगर परिषद राजुराच्या वतीने शहरात फडकणार ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज.

राजुऱ्यात फडकनार ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज- माजी नगराध्यक्ष अरुण धोटे.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा :- आज संपूर्ण देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर राजुरा येथे ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज लागावा, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मरण व्हावे, राष्ट्रध्वजाचा सन्मान व्हावा यासाठी स्वातंत्र्याचे ७५ वर्ष ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन जवळपास वर्षभरापूर्वीच केले होते. हा ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज माय लव्ह माय राजुरा या पाईंट जवळ उभारण्याचे नियोजन होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता हे ठिकाण नगर परिषदच्या लगतच्या भागात मामा तलावाजवळ ठरविण्यात आले असुन मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राजुरा येथे आज दिनांक १३ आँगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता राजुरा नगर परिषदेच्या वतीने ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार आहे. या प्रसंगी शहरवासीयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. १५ आॅगस्टसाठी लोकांमध्येही उत्साह आहे. मात्र केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी पूरता न राहता तो कायम राहला पाहिजे. यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहभाग नोंदविला पाहिजे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

3 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

3 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

4 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

4 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

5 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

5 hours ago