नाशिक शहरातून एक कोटीचा खाद्य तेलाचा साठा जप्त; अन्न औषध प्रशासनाची कारवाई

मानवेल शेळके, नाशिक प्रतिनिधी
नाशिक:-
सर्वत्र सणाचा मौसम आहे. त्यामुळे अन्न पदार्थात भेसळ करून लोकांना भेसळयुक्त खाद विकण्याच्या बातम्या समोर येतात. अशीच एक बातमी नाशिक येथून समोर आली आहे.

सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने संपूर्ण नाशिक विभागात अन्न पदार्थांची तपासणी मोहीम सुरू केली असून, त्याअंतर्गत नायगाव येथील मे. माधुरी रिपायनर्स प्रायव्हेट लिमिटेड या अस्थापनेवर छापा टाकला असता तब्बल 1 कोटी रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न औषध प्रशासनाच्यावतीने नाशिक विभागात तेल उत्पादकांकडून तेलाचे नमुने घेण्यात येत असून, ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. नाशिक विभागात ही मोहीम 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली.

या कालावधीत स्थानिक व नामांकित मोठ्या ब्रँड्सचे देखील खाद्यतेलाचे नमुने सर्वेक्षणासाठी घेण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील शिंदे गाव येथे अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार, अमित रासकर, अविनाश दाभाडे यांनी माधुरी रिफायनर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे छापा टाकून विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. याची किंमत 1 कोटी 10 लाख, 11 हजार 280 रुपये इतकी आहे. या अस्थापनेत सापडलेल्या साठ्यामध्ये खाद्यतेलाच्या डब्यावर लावलेल्या लेबलवर हे खाद्यतेल फोर्टीफाईड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अन्न औषध प्रशासनाच्या वतीने सक्तीचे करण्यात आलेले लेबल्स लावलेले आढळले नाही. जप्त करण्यात आलेले तेल अप्रमाणित असल्याचा संशय आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक विभागात खाद्यतेलाचे 31 व वनस्पतीचे 1 असे एकूण 32 सर्वेक्षण नमुने तपासणी साठी घेण्यात आले आहेत. ही कारवाई नाशिक विभागाचे सह आयुक्त, गणेश परळीकर व सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

15 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

18 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago