बचाव पक्षाच्या वकील एड. अंकिता रा. जैस्वाल यांचा यशस्वी युक्तिवाद.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- वरूड तालुक्यातील एका विवाहित महिलेने आपल्या पतीने तिच्यावर आणि तिच्या मुलीवर कौटुंबिक हिंसाचार झाला म्हणून तिला खावटी देण्यात यावी याकरिता वरुड न्यायालयात कलम 125 सीआरपीसी अंतर्गत पाच हजार रुपये प्रत्येकी असा खावटी रक्कम मिळण्याचा अर्ज केला होता. या प्रकरणी वरूड न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
पत्नीने आपल्या पती वर कौटुंबिक हिंसाचार केलाचा गंभीर आरोप करत वरूड न्यायालयात खावटी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पत्नीने प्रस्तुत प्रकरणात म्हटले की ती कोणत्याही कामधंदा करीत नाही व सर्वस्वीरित्या ती पतीवर अवलंबून आहेत, तसेच पती हा उच्चशिक्षित असून हायस्कूलला शिक्षक आहे व त्याला पंधरा हजार रुपये पगार मिळतो व पतीकडे साठ लाखाचा बंगला व एक एकर शेत तसेच प्लॉट आहेत परंतु पत्नीने जे काही पतीचे उत्पन्न अर्जात नमूद केले ते सिद्ध केले नाही, उलट पतीचे स्वतःचे पगार पत्रक व इतर दस्तऐवज न्यायालयात युक्तिवादाच्या वेळेस बचाव पक्षाचे वकील एड. अंकिता रा. जयस्वाल यांनी दाखल करून न्यायालयाला सांगितले की पतीकडून पत्नीला पूर्वीच नऊ हजार रुपये खावटी रक्कम मिळत आहेत ती रक्कम पत्नीने प्रस्तुत अर्जात न्यायालयात लपवलेली आहेत तसेच पतीने पत्नी विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार संबंधित रिपोर्ट सुद्धा पोलीस स्टेशनला दिलेले आहेत,
यावेळी बचाव पक्षाच्या वकील एड. अंकिता रा. जैस्वाल यांनी युक्तिवाद करताना न्यायालयात म्हटले की पतीकडे जास्त उत्पन्न नाही व त्याला पत्नीला व मुलीला नऊ हजार रुपये खावटी देऊन जी काही रक्कम उर्वरीत आहे त्यात स्वतःच्या उदरनिर्वाह व म्हाताऱ्या आईच्या पालन पोषणाची जिम्मेदारी सुद्धा पतीवर आहेत. या सर्व गोष्टी एड. अंकिता रा. जयस्वाल यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे न्यायनिवाडे दाखल करून यशस्वीरित्या युक्तिवाद करताना नमूद केल्या.
पतीला या प्रस्तुत प्रकरणात दि. 27 फेब्रुवारी 2023 ला लंकेश्वर सहन्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरुड यांनी या प्रकरणी महत्वपूर्ण न्याय निवाडा देऊन पतीला खूप मोठा दिलासा दिला आहेत तसेच पत्नीचा खावटीचा अर्ज नामंजूर केला आहेत.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…