पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :–दि.०१.०३.२०२३ रोजी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा, पुणे शहर यांना गोपनिय माहिती मिळाली की, जय भवानी लॉजींग अॅण्ड बोर्डींग, उबाळे नगर मॅपल हॉटेल जवळ, वाघोली, पुणे येथे मुलींना वेश्या व्यवसायासाठी ठेवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी बनावट ग्राहक पाठवुन खात्री केली असता, त्याठिकाणी वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०४ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये ०३ महिला पश्चिम बंगाल व ०१ महिला हि बांगलादेशी असुन त्यांना संरक्षणकामी रेस्क्यु फाउंडेशन, हडपसर, पुणे येथे ठेवण्यात आले आहे.
सदर प्रकरणी ताब्यात घेतलला ०१ आरोपी व ०५ पाहिजे असे दाने आरोपी विरुद लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुरनं १७७ / २०२३ भादवि ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कारवाई करीता लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे. पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जगदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…