अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, दि. 3 मार्च:- श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८० वा वार्षिक उर्स दि.३ ते ९ मार्च २०२३ दरम्यान वाकी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
दि.३ मार्च रोज शुक्रवारला परंपरेनुसार नागपूर येथील ताजबाग शरीफ इथून शाही संदल निघून प.पु.काशिनाथजी डहाके (पाटील) यांच्या वाकी येथील वाड्यात येईल. तेथून सायंकाळी ५.३० वा. ताजुद्दिन बाबा दरबारात पोहोचेल. परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वरराव डहाके (पाटील) यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल. या वार्षिक उर्स चे उद्घाटक सायंकाळी ६ वाजता सुनीलबाबू केदार माजी मंत्री यांच्या हस्ते तसेच खा.बाळूभाऊ धानोरकर यांच्या अध्यक्षेखाली आ.सुधाकरराव अडबाले, डॉ.अशोक जीवतोडे राष्ट्रीय समन्वय ओबीसी माहासंघ. मुक्ताताई कोक्कडे अध्यक्ष जि.प. नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोहरराव कुंभारे माजी उपाध्यक्ष जि. प. नागपूर, सौ.अरुनाताई शिंदे सभापती पंचायत समिती सावनेर, सौ.जिजाबाई बागडे सदस्य पंचायत समिती सावनेर, सौ.अन्नपूर्णाताई डहाके सरपंच ग्रा.प.वाकी या मान्यवरांच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते महापूजा करून उर्स प्रारंभ होईल.
या उर्स कार्यक्रमादरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम होईल ६ मार्च ला राजे रघुजीराव भोसले व राजे मोधोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम होईल. ७ मार्च ला सकाळी १० वाजता ह.भ. प निलेश बुटे महाराज आळंदीकर यांचे कीर्तन होईल. दि.८ मार्च ला सकाळी १० वाजता ह.भ. प कनेरकर महाराज (चिखलसावंगी) यांचे कीर्तन होईल. दि ९ मार्च ला सकाळी ९ वाजता ह.भ.प डॉ.जलाल महाराज सय्यद (नाशिक ) महाराष्ट्र यांचे गोपाल काल्याचे किर्तन होऊन उत्सवाचा समारोप होईल.
उत्सवादरम्यान भाविकांनी नियमाचे पालन करूनच दर्शन घ्यावे. तसेच भाविकांनी कोठेही गर्दी करु नये. असे आव्हान ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…