अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली असून रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश आले आहे ७/०१/२०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत ग्राम चेलका गावातील गरोदर माता श्रीमती उषा मनोहर इंगळे यांना प्रसुती करीता प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे आणले असता त्या ठिकाणी गरोदर मातेला उपचार मिळाले नसल्याने परस्पर ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकळी येथे घेऊन जावे लागले दरम्यान रुग्णवाहीकेतच महिलेची प्रसूती झाली व वेळेवर उपचार मिळून शकल्याने बाळाचा मृत्यू झाला या घटनेत जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्नसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती त्यानुसार या घटनेची चौकशी करिता समिती गठीत करून सदर चौकशी अहवालानुसार दोषी आढळलेल्या डॉक्टर प्रतिभा डांगे वैद्यकीय अधिकारी, यांची एक वेतन कपात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे श्रीमती नंदा गायकवाड आरोग्य सेविका यांची सुद्धा एक वेतन वाटप करण्यात आली आहे व श्रीमती अनिता भोंडणे कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचे पाच टक्के वेतन कपात करण्यात आले आहे परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित देशमुख हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांना चौकशीतून वगळण्यात आल्या असल्याकारणाने मृत बाळाचे वडील मनोहर इंगळे यांनी सदर तक्रार उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्याकडे केली असून ती तक्रार आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिली व डॉक्टर अमित देशमुख यांची पुनश्च चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अमित देशमुख यांच्या विरोधात पुन्हा चौकशी समिती गठित केली आहे यामुळे उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्नसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीला यश आले असून पीडित मनोहर इंगळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत व डॉ अमित देशमुख यांच्या वर जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…