पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :–सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या हादीत वाहन चोरी च्या अनुशंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर यांना याच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की. एक इसम वडगाव ब्रिजचे खाली आलो असता घायरी फाट्याजवळ, एक इसम केसरी रंगाची यामाहा गाडी घेवुन थांबला असुन त्याने अंगात मरून रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळवून वरिष्ठांनी योग्यती कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर बातमीच्या ठिकाणी जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता बातमीत नमुद वर्णनाचा एक इसम धायरी फाट्याजवळ, केसरी रंगाची यामाहा गाडी घेवुन थांबला दिसला आमची बातमीप्रमाणे खात्री होताच त्यास आमची येण्याची चाहुल लागू न देता त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव व पत्ता रोहन महेंद्र देवरकर वय १९ वर्षे रा.मुळ रा. कुमार निवास आकरा फाटा वडगाव निंबाळकर ता. बारामती जि पुणे सध्या रा. मानकर बिल्डींग प्लॅट नं ३०१ पोकळे नगर, सरडे बाग उत्तमनगर पुणे असे सांगितले, त्यानंतर त्याचेकडे ताब्यात असलेल्या यमाहा मोटार सायकल गाडीचे कागदपत्र व लायसन्स बाबत विचारणा केली असता तो काही न बोलता कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहुन उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याचा आम्हांस संशय आल्याने त्याचेकडे त्याचे ताब्यातील यमाहा मोटार सायकल बाबत अधिक तपास करता त्याने सदरची मोटार सायकल ही हॅपी कॉलनी दागट आळी वडगाव पुणे येथुन चोरल्याचे सांगितले असता त्यास अटक करुन अधिक चौकशी करता त्याचेकडुन खालील गुन्ह्यामधील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१) सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि नं. ११४ / २०२३ भा द वि कलम ३७९
२) सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि. नं. ११५/२०२३ भादवि कलम ३७९
३) सिंहगड रोड पो स्टे गुन्हा रजि. नं. ०३ / २०२३ भादवि कलम ३७९
४) वारजे माळवाडी पो स्टे गुन्हा रजि. नं. ४२ / २०२३ भादवि कलम ३७९
५) उत्तमनगर पो स्टे गुन्हा रजि.नं. ११/२०२३ भादवि कलम ३७९
६) उत्तमनगर पो स्टे गुन्हा रजि. नं. २४/२०२३ भादवि कलम ३७९
७) लोणीकाळभोर पो स्टे गुन्हा रजि. नं.६५२/२०२२ भादवि कलम ३७२
८) वडगाव (कोल्हापुर) पो स्टे गुन्हा रजि. नं. ९१/२०२३ भादवि कलम ३७९ असे एकुण ०८ गुन्हे उघडकीस आणुन एकूण ८ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन पुढील तपास सपोनि सचिन निकम सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. रितेश कुमार सो. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर मा. संदिप कर्णिक सो, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.राजेंद्र डहाळे सो पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा सुहेल शर्मा सो. पोलीस उपआयुक्त परीमंडळ – ३. श्री राजेंद्र गलांडे सो. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री शैलेश संखे सो वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, अमित बोडरे, राजाभाऊ वेगरे, अमोल पाटील, सागर शेंडगे देवा चव्हाण, स्वप्नील मगर, अविनाश कोडे, विकास बांदल, विकास पांडुळे यांचे पथकाने केली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…