मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपूर्वी एक खळबळ जनक घटना समोर आली होती. इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेवाडी शिवारात एक अज्ञात कार जळालेल्या अवस्थेत आढळली असून यामध्ये एक व्यक्ती देखील पूर्णपणे जळालेले अवस्थेमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या परिसरात आंबेवाडी शिवारात जळालेल्या अवस्थेत कार मिळाली होती त्यामध्ये एक व्यक्ती पूर्णपणे जळून गेलेली असल्याचेही आढळून आले होते. दरम्यान कारसह एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने उलटसुलट चर्चा रंगली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर हत्या झाल्याची बाब निष्पन्न झाल्यावर घोटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ही व्यक्ती कोण ? हत्या का केली ? असे विविध प्रकारच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते.
घोटी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर हत्या झालेल्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यामध्ये माजी सैनिक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर हत्या करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये एक अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील माजी सैनिक संदीप पुंजाराम गुंजाळ यांची हत्या झाली होती. समृद्धी महामार्गाचे सुरक्षा रक्षक म्हणून ते काम करत होते. त्यानंतर ते त्यांच्या कारमधून घरी जात असतांना त्यांची हत्या करण्यात आली होती.
हत्या झाल्यानंतर संदीप गुंजाळ यांचा मृतदेह त्यांच्याच कारच्या पुढील सीटवर बांधून आंबेवाडी येथील निर्जन स्थळी घेऊन जात गाडीतील डिझेल काढून त्यांच्या अंगावर टाकून पेटवून देण्यात आल्याची कबुली दोन्ही आरोपीने दिली आहे.
इगतपुरी येथील नांदगाव सदो येथील आकाश चंद्रकांत भोईर आणि एका अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तपास करत असतांना त्यांनी खुनाची कबुली दिली असून खून करण्यामागील धक्कादायक कारण यानिमित्ताने समोर आले आहे.
संदीप गुंजाळ हे घरी जात असतांना त्यांच्या कारचा दुचाकीवर असलेल्या आकाश भोईर आणि त्याचा अल्पवयीन सोबतीला कारचा कट लागला होता. त्याचा राग आल्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाली आणि त्यानंतर त्या दोघांनी चाकूने वार केले होते. त्यानंतर त्यांनी निर्जनस्थळी घेऊन जात पेटवून दिले होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…